Sumit Arora: चर्चा तर होणारच! गन अन् गुलाब ट्रेलरमधील सुमित अरोराच्या वन- लाइनर्सने जिंकली प्रेक्षकांची मनं
Sumit Arora: चित्रपट निर्मितीच्या जगात संवादाना अधिक महत्त्व आहे. चित्रपटाचे डायलॉग (Dialogue) हे कायम चर्चेत राहणारे असले की, त्या सिनेमाची चर्चा देखील तितक्याच वेगाने होत असते. गन आणि गुलाब या आगामी वेब सीरिज (Web series) मधल्या डायलॉगने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली असून संवाद लेखक सुमित अरोरा यांनी शब्दांना जादूने प्रेक्षकांची आणि नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत.
बहुप्रतिक्षित ट्रेलरमधील वन-लाइनर्स ने डिजिटल मनोरंजन विश्वात धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरने सगळ्यांची मन जिंकली असून ही वेब सीरिज रिलीजसाठी सज्ज झाली आहे. एका मॉन्टेजमध्ये राजकुमार रावच्या पान टिपू आवाजासह एक खास डायलॉग प्रेक्षकांची मन जिंकून घेतो “कहते है हर इंसान के अंदर एक शैतान होता है. और कसम पैदा करनावाले की, वो शैतान को अंदर ही रहना चाहिये ”
तसेच ट्रेलरमधील एका विचित्र भूमिकेच्या परिचयामध्ये सतीश कौशिकचे भूमिका गुलशन देवय्या यांनी साकारलेल्या गूढ प्रतिद्वंद्वीची ओळख करून देते, “चार कट आत्माराम: ये चार चरणो में आत्मा की शुद्धी करता है. अशा अरोरा यांच्या संवादांमधून विनोदी दिसणार आहे. सुमित अरोराचा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवास हा संवादांद्वारे चिन्हांकित आहे.
Thank You For Comingची नवी इनिंग; अनिल कपूरची लेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
स्त्री आणि 83 सारख्या चित्रपटांपासून ते ‘द फॅमिली मॅन’ आणि दाहासारख्या वेब शोपर्यंत अरोरा यांनी आपल्या कलाकृतीने खूप प्रेम मिळवलं आहे. गन आणि गुलाब या सिरींजची देखील अपेक्षा वाढत असताना किंग खानसोबतच्या ‘जवान’ मधील त्याच्या आगामी कामासाठी तो उत्सुक असल्याचे बघायला मिळत आहे.