महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून IFFI चित्रपट बाजारात मराठी सिनेमाला संधी
IFFI मध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सहभागासाठी मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
Opportunity for Marathi cinema at IFFI Film Bazaar through Maharashtra Film, Stage and Cultural Development Corporation : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), NFDC Waves Film Bazaar-२०२६ मध्ये सहभागासाठी मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; कंत्राटदारांच्या प्रश्नावरूनही सरकारला घेरलं
दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेले मराठी चित्रपट या निवड प्रक्रियेसाठी पात्र राहणार आहेत. इच्छुक निर्माते तसेच निर्मिती संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत. प्रवेशिका २५ ऑगस्ट २०२६ ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष अथवा gfffm2026@gmail.com या ई-मेलद्वारे सादर करता येतील.
पावसाच्या तुटीचा मराठवाड्याच्या शेतीला फटका; 3.5 लाख हेक्टर क्षेत्र घटलं, वाचा चिंताजनक आकडेवारी
मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने NFDC Waves Film Bazaar-२०२६ हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटांना देश-विदेशातील चित्रपट क्षेत्रातील जाणकार, निर्माते, वितरक, गुंतवणूकदार तसेच विविध माध्यमांशी जोडले जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पात्र मराठी चित्रपटांचे निर्माते व निर्मिती संस्थांनी या उपक्रमात अधिकाधिक सहभाग नोंदवून उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले.