Movie On OTT: ओटीटीवर या चित्रपटांची मेजवानी; घरबसल्या लुटा दमदार चित्रपटांचा आनंद

Movie On OTT: ओटीटीवर या चित्रपटांची मेजवानी; घरबसल्या लुटा दमदार चित्रपटांचा आनंद

Best Web Series and Movie On OTT: मनोरंजनमध्ये सध्या अनेक बदल झाले आहेत. सिनेमा, सिरीयलपेक्षा आता तरुण वर्ग ओटीटी जास्त रमत असल्याचे दिसत आहे. दर आठवड्याला ओटीटीवर अनेक नवनवीन कंटेंट चाहत्यांच्या भेटीला येत असतो. चला पाहूया या आठवड्यामध्ये ओटीटी तुम्ही काय पाहू शकता?

‘काला’: डिस्ने प्लस होस्टारवर नुकतीच ‘काला’ ही वेबसीरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. ४ भागांच्या या सीरीजमध्ये तुम्हाला क्राईम, ड्रामा आणि अॅक्शन सर्वच गोष्टी बघायला मिळणार आहे. थ्रिल्लिंग बघायचं असेल तर तुम्ही ही वेबसीरीज बघू शकता.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

‘बम्बई मेरी जान’: अमेझॉन प्राईमवर ‘बम्बई मेरी जान’ ही सीरीज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. कुख्यात दोन दाऊद इब्राहीमच्या जीवनावर ही कथा आधारित आहे. या सीरीजचे दिग्दर्शन शूजात सौदागर यांनी केले आहे. या सीरीजची कथा सुप्रसिद्ध क्राइम लेखक एस हुसैन जैदी यांनी लिहिली असल्याचे सांगितले जात आहे.

‘कोहरा’: ‘कोहरा’ ही वेबसीरीज नेटफ्लिक्सवर बघायला मिळणार आहे. या वेबसीरीजमध्ये पंजामधील कथा दाखविण्यात आली आहे. पेज थ्रीचा कपलच्या मुलाचा खून करण्यात येतो. पोलीस या केसचा नेमका कसा तपास करतात हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे.

Jab We Met 2: ब्रेकअपनंतर करिना अन् शाहिद पुन्हा एकत्र?, अभिनेता म्हणाला..

‘सायलेन्स’: जुन्या सिनेमापैकी मनोज वायपेयींचा एक कमाल असा सिनेमा ‘सायलेन्स’ झी ५ वर बघायला मिळणार आहे. पोलीस इन्स्पेक्टर मनोज वायपेयीं न्यायाधीशांची न्यायाधीशांच्या मुलीच्या खुनाची केस खूप नेमकी कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात.

‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’: जर तुम्हाला रोमॅंटिक काही बघायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय नेटफ्लिक्सवर उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिल्या नजरेमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या प्रेमी युगुलांची कथा तुम्हाला एक सुंदर मेसेज देखील मिळणार आहे.

‘सेक्स एज्युकेशन’: नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेबसीरीज सेक्स एज्युकेशनचा नवीन सीजन प्रदर्शित होणार आहे. २१ सप्टेंबर दिवशी हा नवीन सीजन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जर तुम्ही ही सीरीज पहिली नसेल तर या सीरीजचे तीन भाग बघायला मिळणार आहे. यातून तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube