‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत नवा ट्विस्ट’; ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच दुराव्याचं सत्य समोर येणार
कलर्स मराठीवरील पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अर्जून आणि सावीच्या नात्यातील दुराव्यातील सत्य जगासमोर येणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच प्रेक्षकांना हा अनुभव पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत दोघांमधील दुरावाचं प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे पण येत्या 15 फेब्रुवारीला अर्जुन सावीचा स्विकार करणार आहे. त्यामुळे या मालिकेत आता नवा ट्विस्टच पाहायला मिळणार आहे.
Arvind Kejriwal : दिल्लीत फक्त एक जागा; जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासह AAP ने काँग्रेसला दिली डेडलाईन
प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते अखेर तो क्षण या व्हॅलेंटाईन डेला अनुभवायला मिळणार आहे. म्हणजेच अर्जुन सावीच्या नात्यातला दुरावा आता संपणार आहे.
आत्तापर्यंत सावीने नेहमीच अर्जुनसाठीचं प्रेम व्यक्त केलं आहे. पण अर्जुनने सावीच्या भूतकाळामुळे तिला स्वतःपासून दूर केलं आहे. येत्या 15 फेब्रुवारीच्या भागात अर्जुन सावीचा स्वीकार करणार आहे.
चव्हाणांच्या राजीनाम्याची मुहूर्तमेढ आठ महिन्यांपूर्वीच रोवली होती! शरद पवारांच्या नेत्याचा बडा दावा
व्हॅलेंटाईन-डेसाठी अर्जुनने सावीसाठी स्पेशल सरप्राईज प्लॅन केला आहे. आता अर्जुन सावीसाठीचं प्रेम व्यक्त करणार आहे. या दोघांचे रोमांटिक क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अर्जून सावीला गुलाब देऊन प्रोपोज़ करणार आहे. तिच्यासोबत रोमँटिक डान्स बघायला मिळणार आहे. आत्तापर्यंत सावीने अर्जुनला प्रत्येक संकटात साथ दिली. यापुढे प्रेक्षकांना अर्जुन-सावी एकत्र लढताना दिसणारं आहे. सावी-अर्जुनच्या साथीने आता दोघांच्या प्रेमाचा गोडवा राहणार कायम ठेवत अतूट राहणार आहे.
बारा बलुतेदारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार; CM शिंदेंची ग्वाही
कलर्स मराठीवर पिरतीचा वनवा उरी पेटला ही मालिका सोमवार ते शुक्रवारी रात्री 10 वाजता प्रदर्शित होते. येत्या 15 फेब्रुवारीला मालिकेत अर्जून आणि सावीमध्ये वनवा पेटणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचणार असल्याचं बोललं जात आहे. अर्जुन सावीच्या नात्यातील दुराव्याची संधी साधून फायदा करून घेण्याचा प्लॅन खलनायकांचा आहे. पण या गेमचे खरे राजा राणी अर्जुन सावी आहेत. आता नेमकं असं काय झालं ज्यामुळे अर्जुन-सावी एकत्र आहे? नात्यातलं हे सत्य सगळ्यांपासून का लपवलं? या दुराव्याच्या नाटकाचं नेमकं कारण काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर 14 फेब्रुवारीच्या भागात पाहायलाल्या मिळतील तेव्हा प्रेक्षकांनी हा अनुभव कलर्स मराठी वाहिनीवर नक्की घ्यावा…