Prakash Raj : प्रकाश राज यांनी PM मोदींची हिटलरशी केली तुलना, म्हणाले…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 05T112943.236

Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ते ओळखले जातात. ते राजकारणाविषयी नेहमी त्यांचे मतं मांडत असताना दिसून येत आहे. अनेकदा ते पंतप्रधान मोदींवर (Prime Minister Narendra Modi) टीका करत असल्याचे दिसून येतात. प्रकाश राज यांनी नुकतंच एक नवीन ट्वीट (Tweet) केले आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक फोटो शेअर (Share photos) केला आहे.

प्रकाश राज यांनी तो फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींना हिटलर असलयाचे संबोधले आहे. नरेंद्र मोदींच्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत लहान मुलं असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये त्यांच्या आणि मुलांमध्ये काटेरी तार आहे. तर, हिटलरच्या फोटोमध्ये या बाजुला तो, त्याच्यासमोर मुलं आणि मधे काटेरी तार असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही फोटोंची फ्रेम सेम म्हणजेच सारखी आहे.

हा फोटो कोलाज केल्याचा दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते. भविष्य या काटेरी तारांमागे आहे, सावध राहा…” असं या फोटोना त्यांनी कॅप्शन दिले आहे. प्रकाश राज यांच्या ट्विटनंतर अनेक जण त्यांच्यावर जोरदार टीका करत आहे. देशाच्या पंतप्रधानांची तुलना हिटलरशी केल्याने मोदी भक्त चांगलेच संतापले आहेत.

एमटीव्ही रोडीजचा धमाकेदार प्रोमो जारी…रिया चक्रवर्ती दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये

काही जण मात्र त्यांचं समर्थन करताना देखील दिसत आहेत. दरम्यान प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना करण्याची ही पहिली वेळ नाही, तर याअगोदर देखील प्रकाश राज यांनी त्यांची तुलना हिटलरशी केली आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरचा वृत्तपत्र वाचत असल्याचे फोटो शेअर केले होते. त्यावेळी त्यांनी मोदींना हिटलरचा पुनर्रअवतार म्हटले होते. आणि प्रकाश राज यांच्या या ट्विटवरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

Tags

follow us