मेगा ऑफर!!! फक्त ७० रुपयात पाहा कोणताही सिनेमा, कधी आणि कुठे वाचा सविस्तर
Multiplex Subscription: गेल्या काही दिवस बॉलिवूडचे (Bollywood) सिनेमे बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे दाक्षिणात्य सिनेमानीही चाहत्यांना (PVR Multiplex) सिनेमागृहाकडे खेचून आणलं आहे. गेल्या काही महिन्यामध्ये ‘जेलर’, ‘गदर २’, ‘पठाण’, ‘जवान’, ‘ओह माय गॉड २’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यासारख्या अनेक सिनेमांना चाहत्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली आहे.
सिंगल स्क्रीन थेटर्ससोबत मल्टीप्लेक्सच्या बाहेर सुद्धा हाऊसफुल्लचा बोर्ड बघायला मिळाला होता. तरी सिनेमा बघायचं म्हंटलं की, खिशाला १ हजार रुपयांची कात्री लागतेच अगदी सहज लागते. हीच परिस्थिटी लक्षात घेता ‘PVR multiplex’ चेन लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मसारखा खास सबस्क्रिप्शन प्लॅन आणायच्या तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्लॅनमध्ये सिनेमाप्रेमींना ६९९ रुपयांमध्ये महिन्याला १० सिनेमा बघायला मिळणार आहेत. या हिशोबाने चाहत्यांना एक सिनेमा केवळ ७० रुपयांमध्ये बघायला मिळणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे भारतातील पहिलं थेटर सबस्क्रिप्शन मॉडेल राहणार आहे. एवढेच नव्हे तर हा प्लॅन फक्त सोमवार ते शुक्रवार या दिवसांसाठी लागू राहणार आहे.
Priya Bapat: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार अन् चर्चा सुरु…
या प्लॅन अंतर्गत दिवसाला एक तिकीट भेटणार असून समोरच्या व्यक्तीला सरकारी ओळखपत्र देखील दाखवावे लागणार आहे. ‘PVR’च्या मालकांच्या प्लॅन ज्येष्ठ मंडळी आणि गृहिणी यांना मोठा फायदेशीर ठरू शकणार आहे. ३५ ते ४० या वयोगटामधील लोकांना सिनेमागृहांकडे वळवण्याचा सिनेमागृहांच्या मालकांचा हेतु असणार आहे. एकूणच ‘PVR’चा हा सबस्क्रिप्शन प्लॅन नेमका किती फायदेशीर असणार आहे, हे येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे.