R Madhavan: … म्हणून अभिनेता आर माधवन ठरतोय अनेक ब्रँडचा फेव्हरेट चेहरा
R Madhavan : अभिनेता आर माधवन (R Madhavan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘रॉकेट्री: नांबी इफेक्ट’ (Rocketry: The Nambi Effect) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आर. माधवननं केलं होतं. मॅडी म्हणजे आर माधवन (R Madhavan) ज्याने स्वतःच्या अभिनय कौशल्याने जगभरात आपला ठसा उमटवला आहे.
ज्याने अभिनयाने भारतीय चित्रपट उद्योगात स्वतःसाठी एक अनोखं स्थान निर्माण केले आहे आणि म्हणून तो प्रेक्षकांचा देखील लाडका अभिनेता बनला आहे. त्याच्या यशांमुळे त्याला मिडास टचने अभिनेता बनवले आहे, यात शंका नाही आणि विशेष म्हणजे ही प्रतिष्ठा केवळ रुपेरी पडद्यापुरती मर्यादित नाही तर तो ब्रँड सहयोगच्या विश्वात देखील तितकाच खास ठरला आहे.
आर माधवन हा अनेक ब्रँड्ससाठी लोकप्रिय ठरण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे त्याचे संपूर्ण जगात आपल्या अभिनयाची जादू निर्माण करतोय आणि प्रेक्षकांना आपलंसं करून घेतोय. त्याची लोकप्रियता भाषेतील अडथळ्यांना पार करून तो जगभरात प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आणि म्हणून अनेक ब्रँड साठी तो एक उत्तम चेहरा ठरतो.
Priyanka Chopra निर्मित WOMB दाखवणार स्त्रियांचा संघर्ष, स्वप्न अन् हक्काची कथा
आर माधवनने आजवर दागिने, मनोरंजन, फॅशन ते तंत्रज्ञान, क्रीडा आणि पर्यटन यासारख्या अनेक ब्रँड सोबत काम केलं आणि यातून तो सिद्ध करतो की अष्टपैलुत्व केवळ रुपेरी पडद्यापुरती मर्यादित नाही तर तो ज्या ब्रॅण्डशी देखील तितकाच जोडला जातो. कामाच्या आघाडीवर माधवन त्याच्या नवीन रिलीज ‘शैतान’ च्या यशाचं कौतुक साजर करतोय. अभिनेत्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये तमिळमध्ये ‘अधिरष्टसाली’ आणि ‘टेस्ट’ आणि हिंदीमध्ये ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर’ यांचा समावेश आहे.