Raashii Khanna: अभिनेत्रींना पुरेशा भूमिका मिळत आहेत का? राशी खन्नाने स्पष्टच सांगितले

Raashii Khanna: अभिनेत्रींना पुरेशा भूमिका मिळत आहेत का? राशी खन्नाने स्पष्टच सांगितले

Raashii Khanna : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली राशी खन्ना (Raashii Khanna) बॉलिवूडमध्येही चांगलीच सक्रीय आहे. राशी खन्ना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. (Social media) राशीने बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. प्रचंड मेहनतीच्या जोरावर राशीने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. राशी खन्नाची फिल्मोग्राफी ही व्यावसायिक आणि आशय-आधारित चित्रपटांचे उत्तम मिश्रण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)


आता अभिनेत्रीला एका मुलाखतीमध्ये महिलांना पुरेशा भूमिका मिळत आहेत का असे विचारले असता तिने उत्तर दिले, “आम्ही अजून तिथंपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत, अजून देखील व्यावसायिक चित्रपट करणे तितकेच महत्त्वाच आहे असं मला वाटतं. महिला अभिनेत्री म्हणून मला वाटते की व्यावसायिक आणि आशय दोन्हींचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. तसेच मला हे समजले आहे की मी चित्रपटात केवळ एक प्रॉप्स नाही. महिला आता प्रॉप्स नाहीत तर त्या अभिनेत्री आहे, अस अभिनेत्रीने सांगितले.

थिएटरच्या आघाडीवर राशि खन्नाने 2024 च्या पहिल्या तमिळ हिट ‘अरनमनाई 4’ मध्ये काम केलं आहे, तिने या चित्रपटासह तिचा सलग तिसरा हिट चित्रपट तर नोंदवलाच पण तमिळ चित्रपटसृष्टीची सुवर्ण मुलगी म्हणूनही तिने स्वतः हाला प्रस्थापित केले. सध्या तिच्याकडे प्रकल्पांची एक मनोरंजक लाइन-अप आहे. राशी विक्रांत मॅसीसोबत ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘तलाखों में एक’ च्या रिलीजच्या तयारीत आहे. या पलीकडे तिचा ‘तेलुसू काडा’ नावाचा तेलगू चित्रपटही पाइपलाइनमध्ये आहे.

Raashii Khanna:’योद्धा’ सिनेमाबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला इंडस्ट्रीत…’

‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून केलेली बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

अभिनेत्रीने जॉन अब्राहमच्या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. ‘मद्रात कॅफे’ सिनेमात तिने एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांत काम केलं. मल्याळम इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीने ‘विलन’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर राशीने कधीही मागे वळून बघितलं नाही. राशी खन्ना सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’ या चित्रपटात देखील झळकले होते. योद्धामध्ये राशी खन्नासोबत दिशा पटानीदेखील दिसून आली होती. सिद्धार्थ आणि राशीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube