Raghav Chadha परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक पाहिलात का?

Raghav Chadha परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक पाहिलात का?

Wedding Reception : मनोरंजन क्षेत्रातील बॉलिवूड अभिनेत्री परिणीची चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच मिसेस चड्डा होणार आहे. चाहते त्यांच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या २३ आणि २४ सप्टेंबर दिवशी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर आल्याने चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा १३ मे २०२३ दिवशी दिल्लीमधील कपूरथ हाऊसमध्ये मोठ्या थाटात साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याला अनेक बॉलिवूडकरांसह अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावलायचे बघायला मिळालं होत. आता त्यांच्या लग्नाची चाहत्यांना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती.

Raghav Chadha Parineeti Chopra Wedding Reception Card

Raghav Chadha Parineeti Chopra Wedding Reception Card

राघव-परिणीती यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पांढऱ्या रंगाची आहे. त्यावर त्यांनी मोठ्या अक्षरात, सोनारी रंगात, स्टायलिश आणि हटक्या अंदाजात परिणीती आणि राघव यांची नावे बघायला मिळत आहेत. तर या वेडिंग रिसेप्शन कार्डवर लिहिलेले आहे की,”राघव चड्ढा यांचे आई-वडील अलका आणि सुनील चड्ढा यांच्यावतीने तुम्हाला ३० सप्टेंबर २०२३ दिवशी पंजाब मधील ताज येथील चंडीगढ येथे राघव आणि परिणीती यांच्या रिसेप्शनसाठी निमंत्रित करत आहोत”. २४ सप्टेंबर दिवशी राघव-परिणीतीचा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra


तसेच उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये लग्नाच्या विधींकरिता बुकींग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यापासूनच चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची चांगलीच आतुरता लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या लग्नाचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आणि विधी २३ आणि २४ सप्टेंबर या दिवशी पार पडणार आहेत. याकरिता उदयपूरमधील शानदार हॉटेल लीला पॅलेस बुकींग करण्यात आले आहे.

तसेच हॉटेल उदयविलास येथे लग्नाचे विधी पार पडणार आहेत, आणि येथे पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. तसेच २२ तारखेपासून पाहुण्यांचं आगमन सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या लग्नसोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरु होणार आहेत.

Sukhee Trailer Out: शिल्पा शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

परिणीती आणि राघव यांचा १३ मे दिवशी दिल्लीमध्ये साखरपुडा करण्यात आला होता आणि आता त्यांचं लग्न होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नाला राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचे बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube