अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणूक 2026, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजू पार्सेकर यांचे गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांवरील स्थगिती उठवल्यानंतर काही सदस्यांकडून राजकीय हालचाली सुरू झाल्याचा आरोप पार्सेकर यांनी केला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 41 2

Raju Parsekar’s serious allegations : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या 2026 च्या निवडणुकांभोवती नव्या वादाला तोंड फुटले असून, निवडणूक प्रक्रिया घाईघाईत राबवण्यात आल्याचा आरोप दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी केला आहे. तब्बल 65 हजार सभासदांच्या मतदान आणि उमेदवारी हक्कांशी संबंधित प्रकरणावर 10 मे 2026 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असताना, निवडणूक कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

7 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महामंडळाच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवल्यानंतर काही सदस्यांकडून राजकीय हालचाली सुरू झाल्याचा आरोप पार्सेकर यांनी केला आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत, 18 मे रोजी सार्वजनिक न्यासाच्या निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक कार्यक्रम पत्राद्वारे जाहीर करण्यात आला. यावर आक्षेप घेताना पार्सेकर म्हणाले की, इतक्या महत्त्वाच्या निवडणुकांचा कार्यक्रम पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिकरित्या जाहीर व्हायला हवा होता, जेणेकरून राज्यभरातील सर्व सभासदांपर्यंत माहिती पोहोचली असती. मात्र, तसे न करता अर्ज प्रक्रिया आणि तारखा अतिशय कमी कालावधीत पूर्ण करण्यात आल्या.

हैद्राबादमध्ये पोलिसांना गाडी का फोडावी लागली? माधापूर रेसिंग प्रकरणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

पार्सेकर यांच्या मते, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 10 मेच्या उच्च न्यायालयीन निकालापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण, न्यायालयाने जर सर्व 65 हजार सभासदांना मतदान आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला, तर सध्याच्या मर्यादित मतदारसंख्येवर आधारित समीकरणे बदलू शकली असती. सध्या केवळ 3403 सभासदांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी ही प्रक्रिया लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांविरोधात असल्याचे म्हटले आहे. “निवडणुका होऊ नयेत हा आमचा हेतू नाही. मात्र त्या संविधानिक नियमांचे पालन करून आणि सर्व सभासदांना न्याय देऊन व्हायला हव्यात,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

या आरोपांमुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीभोवतीचा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

follow us