‘रामायण’चा महाराष्ट्रातही जलवा, तळेगावच्या श्री शिवाजी टॉकीजमध्ये सलग 9 दिवस हाऊसफुल्ल शो
भावनिक कथानकामुळे आणि ए. आर. रहमान व हान्स झिमर यांच्या अविस्मरणीय संगीतामुळे देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
‘Ramayana’ is also popular in Maharashtra : नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा व रॉकिंग स्टार यश निर्मित ‘रामायण: पार्ट 1’ या चित्रपटाने 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासूनच एका भव्य सांस्कृतिक उत्सवाचे स्वरूप धारण केले आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि रवी दुबे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने आपल्या भव्य निर्मितीमूल्यांमुळे, भावनिक कथानकामुळे आणि ए. आर. रहमान व हान्स झिमर यांच्या अविस्मरणीय संगीतामुळे देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात जगभरात 1,000 कोटींचा टप्पा पार केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत असून, जागतिक स्तरावर भारतीय कथाकथनाची ताकद अधोरेखित करत आहे.
यंदाचा उन्हाळा होणार अधिक कडक! मार्च 2027 पर्यंत एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता
एकीकडे महानगरांमधील मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे ‘रामायण’ची जादू देशातील छोट्या शहरांमध्ये आणि सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्येही पाहायला मिळत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याजवळील तळेगाव येथील श्री शिवाजी टॉकीज. या टियर-3 शहरातील चित्रपटगृहात चित्रपटाचा हिंदी व्हर्जन प्रदर्शित करण्यात आला असून, सलग 9 दिवस दररोजचे चारही शो हाऊसफुल्ल झाले आहेत. म्हणजेच, एकाच शहरात सलग 9 दिवसांमध्ये एकूण 36 शो प्रेक्षकांनी पूर्णपणे भरून गेले. सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या संख्येने कुटुंबीय आणि तरुणाई हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही तो कायदा करणार; सतेज पाटलांना शह देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
छोट्या शहरांमधील सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये साधारणपणे वीकेंडला अधिक गर्दी पाहायला मिळते. मात्र, ‘रामायण’ने सामान्य कामकाजाच्या दिवशीही चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांची गर्दी कायम राखली आहे. श्री शिवाजी टॉकीजमधील चित्रपटाची ही शानदार कामगिरी दर्शवते की, या महागाथेने सर्वसामान्य प्रेक्षकांशी किती घट्ट नाते जोडले आहे. मोठ्या पडद्यावर हा भव्य अनुभव एकत्रितपणे घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे यातून स्पष्ट होते. महानगरांपासून ते तळेगावसारख्या छोट्या शहरांपर्यंत ‘रामायण’चे यश देशभरात एका उत्सवासारखे साजरे होत आहे.