राणीच्या 30 वर्षांच्या आयकॉनिक प्रवास साजरा करण्यासाठी संपूर्ण इंडस्ट्री एकत्र रणबीरने म्हणाला…
Ranbir Kapoor ला याचा आनंद झाला की चित्रपटसृष्टी त्याच्या आवडत्या अभिनेत्रीच्या 30 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा करत आहे.
Ranbir Kapoor express on industry together celebrate Rani Mukharjis 30 years iconic journey : रणबीर कपूरला हे पाहून मनापासून आनंद होत आहे की भारतीय चित्रपटसृष्टी एकत्र येऊन त्याच्या आवडत्या अभिनेत्री राणी मुखर्जीच्या सिनेमातील 30 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव मर्दानी 3 सोबत साजरा करत आहे. रणबीरच्या पदार्पणाच्या सांवरिया चित्रपटात राणी त्याची सहकलाकार होती आणि त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर, जेव्हा त्याला सर्वाधिक आधाराची गरज होती, तेव्हा राणी त्याच्यासोबत उभी होती. म्हणूनच रणबीर प्रत्येक चित्रपटात, प्रत्येक अभिनयात राणीच्या यशासाठी मनापासून आनंद व्यक्त करतो.
भिडेंच्या विखारी वक्तव्यांची तोफ; शरद पवारांवरील वक्तव्यानंतर अटकेची मागणी जोरात!
रणबीर म्हणतो,“राणी माझ्या पहिल्या चित्रपट सांवरियाची सहकलाकार होती आणि मला मेहनत केली तर खूप पुढे जाशील, असं सांगणारी ती पहिली व्यक्ती होती. ती भेट मी कधीही विसरणार नाही, कारण त्या क्षणी मला तिच्या शब्दांनी प्रचंड आत्मविश्वास दिला. मी तिला व्यक्ती म्हणून जवळून पाहिलं आहे, तिचं काम अगदी जवळून अनुभवलं आहे आणि तिची सौम्यता, मोहकता आणि प्रतिभा पाहून नेहमीच भारावून गेलो आहे.”
शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारतर्फे मुंबईत मंत्रालयात चर्चेसाठी आमंत्रण
तो पुढे म्हणतो,“तिच्या 30 वर्षांच्या आयकॉनिक वारशाचा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण इंडस्ट्री पुढे येताना पाहणं खरंच अद्भुत आहे. मला नेहमी वाटत आलं आहे की राणी ही काळाच्या पलीकडची कलाकार आहे — भारतातील आजवरच्या सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जाईल. तिनं आपल्या कामातून आपली इंडस्ट्री घडवली आहे. तिने निवडलेले प्रोजेक्ट्स आणि भूमिका आज पडद्यावर स्त्रियांना कसं दाखवलं जातं, याची दिशा ठरवतात.”
रणबीर सांगतो की राणीला आपल्या सिनेमातून फक्त आनंद पसरवायचा आहे. तो म्हणतो,“धन्यवाद राणी — चित्रपटांसाठी, आठवणींसाठी, त्या नॉस्टॅल्जियासाठी आणि त्या जबरदस्त अभिनयांसाठी. ती एक अशी मनोरंजनकर्ता आहे जिनं आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना आनंद देण्यासाठी वाहिलं आहे. तिच्या चित्रपटांचा माझ्यावर झालेला प्रभाव शब्दांत मांडणं माझ्यासाठी कठीण आहे.”
कार्स स्वस्त होणार! युरोपियन युनियनशी करार भारत कारवरील आयात शुल्क 40% पर्यंत कमी करणार
राणी मुखर्जीची मर्दानी 3 सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून ती सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरली आहे. महिलांवरील गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणारी मर्दानी फ्रँचायझी प्रत्येक भागात एक गंभीर सामाजिक वास्तव मांडते. मर्दानी 3 मध्ये देशभरातील कमी उत्पन्न गटातील 8–9 वर्षांच्या लहान मुलींच्या अपहरणाचा धक्कादायक मुद्दा उघड केला जाणार आहे, ज्यामागे एक अत्यंत भयावह कारण दडलेले आहे. अभिराज मिनावाला दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित मर्दानी 3 हा चित्रपट सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या कथाकथनाची परंपरा पुढे नेतो.
आयसीसीच्या इशाऱ्यानंतर टी-20 वर्ल्डकपवर बहिष्कार टाकणाऱ्या पाकचा संघ जाहीर पण बांगलादेशसाठी हातावर…
पहिल्या मर्दानीने मानवी तस्करीच्या भयावह वास्तवाचा सामना केला, तर मर्दानी 2ने व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका सिरीयल रेपिस्टच्या विकृत मानसिकतेचा शोध घेतला. मर्दानी 3 समाजातील आणखी एका अंधाऱ्या आणि क्रूर वास्तवात डोकावते, ज्यामुळे प्रभावी, मुद्दा-केंद्रित कथाकथनाची या फ्रँचायझीची परंपरा अधिक बळकट होते.
