Review : मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे – राणी मुखर्जीचा दमदार परफॉर्मन्स, पटकथा मात्र…

Review : मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे – राणी मुखर्जीचा दमदार परफॉर्मन्स, पटकथा मात्र…

प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक
रेटिंग – 3 स्टार्स

मुंबई : आपल्या मुलांपासून दुरावलेली आई आणि आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठीचा त्या आईचा लढा मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटात पाहायला मिळतो. काही वर्षांपूर्वी नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यासोबत घडलेली घटना देशभरात प्रसिद्ध झाली होती. ज्यात नॉर्वेच्या बाल कल्याण सेवांनी त्या जोडप्याच्या मुलांना त्यांच्या आई–वडिलांपासून दूर केलं होतं. आई–वडिल मुलांचा सांभाळ नीट करत नसल्याचा आरोप करत मुलांना ताब्यात घेतलं होतं. याच सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जी आईची मुख्य भूमिका साकारली आहे. बऱ्याच कालावधीनंतर राणी मुखर्जी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकतेय. त्यामुळे तिचा कमबॅक सिनेमा म्हणून बघितलं जात आहे. ही कहाणी आहे. सागरिका चॅटर्जी आणि तिच्या परिवाराची. चार वर्षांपासून सागरिका नॉर्वेमध्ये तिचा पती आणि मुलांसोबत राहत आहे. मात्र त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडते ज्याने त्यांचं कौटुंबिक आयुष्य विस्कळीत होऊन जातं.

नॉर्वेमध्ये राहणाऱ्या परिवाराची ही कहाणी आहे. काही काळानंतर सुरक्षा सेवा अधिकारी त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून दूर करतात. त्यांच्या मुलांना फोस्टर केयरमध्ये ठेवण्यात येते. आई–वडिल मुलांचा नीट सांभाळ करत नसल्याचं कारण देऊन त्या मुलांना ताब्यात घेतलं जातं. इथूनच सागरिकाचा आपल्या मुलांसाठी देशाची सरकार आणि न्याय व्यवस्थेसोबत लढा सुरु होतो. या प्रवासात तिला कोण-कोणते अडथळे येतात हे पाहायला मिळते.

आशिमा छिब्बरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. आईच्या विविध पैलूचे दर्शन या चित्रपटात घडत. मात्र चित्रपटाच्या कमजोर पटकथेमुळे सादरीकरणात त्रुटी जाणवतात. चित्रपटाचा विषय खोलात हाताळला गेला नसल्याचं जाणवतय. ज्यामुळे चित्रपटातील इतर पात्रे ठळकपणे स्पष्ट होत नाहीत. चित्रपटाची कथा ताणल्यासारखही जाणवतं. चित्रपटाचा पूर्वार्ध मूळ विषय समोर आणण्यात वेळखावू वाटतो तर उत्तरार्धात अनेक भावुक करणारे सीन्स लक्षवेधी ठरतात.

चित्रपटाचा संपूर्ण भार राणीने तिच्या खांद्यावर सहज पेललाय. सागरिका चॅटर्जीच्या भूमिकेसाठी तिने योग्य न्याय दिला. सागरिकाच्या भूमिकेत ती पूर्णपणे रुजली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. राणीच्या अभिनयाचा तडका विविध सीनमधून बघणं एक पर्वणी ठरतेय. मात्र संवाद लेखनालाही चांगला वाव असल्याचं जाणवतं. राणीच्या वाट्याला आणखी मजबूत संवाद असते. तर ते पाहणं महत्त्वाचं ठरलं असतं. आईच्या भूमिकेतील पैलू राणीने उत्तम सादर केले.

Amol Kolhe : मानो या ना मानो, अमोल कोल्हेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मिस्टर चॅटर्जीच्या भूमिकेत अनिर्बन भट्टाचार्यचं कामही चांगलं झालय. नीना गुप्ता यांच्या वाट्याला कमी सीन्स असले तरी त्या लक्षवेधी ठरतात. जिम सरभचं वकिलाच्या भूमिकेतील कामही चांगल वाटतय. ही भूमिका तो आणखी चांगल्या पद्धतीने सादर करु शकला असेता असही जाणवतं. छायांकनाच्या बाबतीत हा चित्रपट उजवा ठरतोय.

एल्वर कोयने कोलकाता, नॉर्वे त्याच्या कॅमेऱ्यात उत्तम टिपले आहेत. नम्रता रावचं एडिटींगही चांगलं वाटतय. अमित त्रिवेदीचं संगीत या चित्रपटात महत्त्वाची धुरा सांभाळतायत. चित्रपटाची गाणीही कथेला साजेशी आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत चित्रपटाच्या कथेमध्ये सामावण्यात कमी पडल्याचं जाणवतं. या चित्रपटातील भावनिकता महत्त्वाची धुरा सांभाळते. आई-मुलांच्या नातं अधोरेखित करणारा कथा भावुक करणारी आहे. हा चित्रपट कुटुंबासोबत पाहणं एक वेगळा अनुभव देणारा ठरेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube