ऋषभ शेट्टी पोहोचले जगातील सर्वात प्राचीन मुंडेश्वरी मंदिरात, ‘कांतारा: चैप्टर 1’ च्या यशासाठी मानले आभार
Rishabh Shetty : ऋषभ शेट्टी आणि होम्बले फिल्म्स यांचा ‘कांतारा: चैप्टर 1’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि पहिल्याच

Rishabh Shetty : ऋषभ शेट्टी आणि होम्बले फिल्म्स यांचा ‘कांतारा: चैप्टर 1’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि पहिल्याच दिवशी त्याने यशाचे नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. संपूर्ण देशभरातून मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिक्रियेनंतर हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही मनावर राज्य करत आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘कांतारा: चैप्टर 1’ सतत विक्रम मोडत आहे. या यशानंतर दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी बिहारमधील पटना येथे स्थित मुंडेश्वरी मंदिरात जाऊन चित्रपटाच्या यशाबद्दल देवाचे आभार मानले.
‘कांतारा: चैप्टर 1’च्या जबरदस्त यशानंतर आता ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिहारमधील मुंडेश्वरी मंदिर (Mundeshwari Temple) येथे पोहोचले आहेत. अशा धार्मिक स्थळी चित्रपटाचे प्रमोशन होणे हे स्वतःमध्ये विशेष आहे, कारण ‘कांतारा: चैप्टर 1’ (Kantara: Chapter 1) चा आत्मा श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे. ऋषभ शेट्टी कांतारा चित्रपटाच्या यशासाठी माता आणि भगवान शिव यांचे आभार मानण्यासाठी थेट मुंडेश्वरी मंदिरात गेले.
मुंडेश्वरी मंदिर बिहारच्या पटना येथे आहे. हे भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असून ते सुमारे 600 फूट उंचीवर स्थित आहे. पुरातत्त्वज्ञांच्या मते, याचा इतिहास इ.स. 389 पर्यंत जातो, ज्यामुळे ते जगातील सर्वात प्राचीन अस्तित्वात असलेल्या मंदिरांपैकी एक ठरते. मंदिराच्या गर्भगृहात पंचमुखी शिवलिंग आहे, ज्याचा रंग सूर्याच्या स्थितीनुसार बदलतो, असे सांगितले जाते. हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते आणि नवरात्री तसेच महाशिवरात्रीच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी जमते.
‘कांतारा: चैप्टर 1’ हा होम्बले फिल्म्सचा सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाच्या क्रिएटिव टीममध्ये संगीत दिग्दर्शक बी. अजनीश लोकनाथ, सिनेमॅटोग्राफर अरविंद कश्यप आणि प्रॉडक्शन डिझायनर विनेश बंग्लान यांचा समावेश आहे. त्यांनी मिळून चित्रपटाला दमदार दृश्यात्मक आणि भावनिक रूप दिले आहे.
मन हादरवणारा रहस्यमय प्रवास ‘असंभव’; चित्रपटाच्या टीझरने वाढवली उत्कंठा
हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आपली सांस्कृतिक मुळे घट्ट धरून हा चित्रपट विविध भाषा आणि प्रदेशांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. ‘कांतारा: चैप्टर 1’ सोबत होम्बले फिल्म्स भारतीय सिनेमाच्या सीमा विस्तारत आहे. हा चित्रपट लोककथा, श्रद्धा आणि सिनेमॅटिक कौशल्याचा सुंदर संगम साजरा करतो.