रितेश-जिनिलियाचा रोमँटिक फोटो व्हायरल! राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याशी नेटकऱ्यांनी जोडला संबंध

Riteish Deshmukh Genelia Viral Photo : रितेश-जिनिलियाच्या रोमँटिक फोटोची चर्चा रंगली असून राहुल गांधींच्या वक्तव्याशी जोडला संबंध.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 24T172500.424

Riteish Genelia Photo : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा एक खास फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोतील दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, या फोटोची चर्चा केवळ त्यांच्या प्रेमळ क्षणांपुरती मर्यादित राहिलेली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच आपल्या आई-वडिलांच्या नात्याबद्दल सांगितलेल्या एका आठवणीशी नेटकऱ्यांनी या फोटोची तुलना केली आहे. त्यामुळे रितेश-जिनिलियाच्या पोस्टला राजकीय संदर्भही जोडला जात आहे.

रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या छायाचित्रात हे जोडपे एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे. दोघांनीही गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने त्यांचे ट्विनिंगही लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, समोर खुर्ची उपलब्ध असतानाही जिनिलिया रितेशच्या मांडीवर बसली असून त्याला प्रेमाने पिझ्झा भरवताना दिसते. या फोटोला रितेशने ‘Table For Two, Chair For One’ असे भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्यावर जिनिलियानेही ‘Confused which one is the meal’ अशी मिश्किल आणि रोमँटिक कमेंट केली आहे.

सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तकाचे प्रकाशन; अनेक आठवणींचा उलगडा!

या फोटोमुळे नेटकऱ्यांना राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात सांगितलेल्या आठवणीची आठवण झाली. ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राहुल गांधी यांनी आई-वडील राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नात्यातील एक खास सवय सांगितली होती. घरात नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण करताना वडील खुर्चीवर बसायचे आणि आई त्यांच्या मांडीवर बसायची. लहानपणी प्रत्येक घरात असेच होत असावे, असे आपल्याला वाटायचे. मात्र, मित्रांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे आई-वडील असे बसलेले नसल्याचे पाहून आपल्याला आश्चर्य वाटायचे, अशी आठवण राहुल यांनी सांगितली होती.

राहुल गांधी यांच्या या विधानावर त्यावेळी राजकीय वर्तुळातून टीका झाली होती, तर सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल करण्यात आले होते. आता रितेश आणि जिनिलियाचा फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोन्ही प्रसंगांची सांगड घातली आहे. काही जणांच्या मते, या फोटोमधून राहुल गांधी यांच्या विधानाशी साधर्म्य दाखवण्यात आले आहे, तर काहींनी याला केवळ रितेश-जिनिलियाचा आणखी एक प्रेमळ क्षण म्हटले आहे. त्यामुळे एका साध्या रोमँटिक फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

follow us