Robert De Niro: वयाच्या 79 व्या वर्षी सातव्यांदा बाप झालाय ‘हा’ अभिनेता; चाहत्यांना दिली गुडन्यूज!

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 10T113350.126

Robert De Niro: रॉबर्ट डी निरो (Robert De Niro) हे हॉलीवूडमधील (Hollywood) एक प्रथितयश अभिनेते आहेत. जगभरात तर त्यांचे लाखो चाहते आहेत. पण तरी देखील भारतात त्यांना फॉलो करणारे बरेच लोक आहेत. (About My Father) हॉलीवूडमधील एक ताकदीचा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असते. रॉबर्ट डी निरो हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेमध्ये असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Robert Deniro (@robertdenlro)


वयाच्या ७९ व्या वर्षी सातव्यांदा बाप झाल्याने त्यांच्याविषयी सध्या चांगलीच जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अबाऊट माय फादर’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान रॉबर्ट डी निरो यांनी एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. ७९ वर्षाच्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने आपल्या सातव्या अपत्याला जन्म दिल्याचा खुलासा या मुलाखतीमध्ये त्यांनी केला आहे.

या मुलाखतीत त्यांना सहाव्या मुलाविषयी विचारणा झाल्यावर खुद्द रॉबर्ट यांनीच हे स्पष्ट केले की नुकतेच त्यांना पुन्हा पिता व्हायचे सौभाग्य लाभले आहे. याविषयी बोलत असताना रॉबर्ट डी निरो त्या मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला बरोबर माहिती देत म्हणाले आहे की, खरे तर सातव्या मुलाविषयी विचारू शकता, मला नुकतेच एक मूल झाले आहे. रॉबर्ट डी निरो यांच्या या सातव्या मुलाची आई टिफनी चेन असू शकते असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

मध्यंतरी एका डिनर डेटच्या दरम्यान तिने तिच्या बेबी बम्पचे फोटोज शेअर केले होते. रॉबर्ट डी निरो यांनी त्यांच्या या नव्या मुलाविषयी फारशी माहिती दिली नाही, पण त्यांच्या नजीकच्या लोकांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. १९७१ मध्ये रॉबर्ट डी निरो हे प्रथम वडील झाले जेव्हा त्यांनी आपल्या पूर्वपत्नीच्या मुलीला दत्तक घेतले आहे. या दोघांना ४६ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. रॉबर्ट डी निरो यांना त्यांच्या एक्स-गर्लफ्रेंडकडून देखील दोन मुले आहेत. यासोबत पूर्वपत्नी ग्रेस हायटॉवरकडून राॅबर्ट डी निरो यांना एक मुलगा अन् एक मुलगी आहे.

Tags

follow us