दृश्यम 2 नंतर रॉकस्टार डीएसपी पुन्हा अजय देवगणसोबत काम करणार

दृश्यम 2 नंतर रॉकस्टार डीएसपी पुन्हा अजय देवगणसोबत काम करणार

Rock Star DSP : रॉकस्टार डीएसपी म्हणून ओळखले जाणारे संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी नुकताचं पुष्पा: द रायझिंग या तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाच्या संगीताचे भरभरून कौतुक केले.

MK Stalin : मुलासाठी बाप मैदानात; उदयनिधींच्या वक्तव्यावर CM स्टॅलिन यांनी सोडले मौन

रॉकस्टार डीएसपी त्याच्या आकर्षक ट्यून आणि फूट-टॅपिंग बीट्ससाठी ओळखले जातात. ही एक अनोखी शैली आहे. जी पारंपारिक भारतीय संगीताला आधुनिक ध्वनींसोबत मिसळते. पुष्पा: द रायझिंगचा साउंडट्रॅक प्रचंड यशस्वी झाला, ‘ओ अंतवा’ आणि ‘श्रीवल्ली’ सारखी गाणी झटपट हिट झाली. . DSP च्या संगीताने चित्रपटाच्या एकूण आकर्षणात भर घातली आणि तो ब्लॉकबस्टर हिट होण्यास मदत केली.

Nikhil Bhambri: अभिनेता निखिल भांबरी करतोय ‘या’ नव्या प्रोजेक्टची तयारी!

त्यानंतर डीएसपी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुनरागमन करण्याच्या तयारीत असताना चित्रपटसृष्टीत नवा उत्साह निर्माण झाला आहे. अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका या त्रिकूटाने अभिनीत तो नवा प्रोजेक्ट करणार आहे. विशेषतः रॉकस्टार डीएसपी आणि अजय देवगण यांनी ‘दृश्यम 2’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर आता नवीन काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

रॉकस्टार डीएसपी त्याच्या भावनिक सुरांसाठी प्रसिद्ध आहे.दृष्यम 2 मध्‍ये अजय देवगणसोबतच त्याच काम हिट ठरल होत.मनमोहक कथा आणि अविस्मरणीय संगीताने परिभाषित केलेल्या उद्योगात रॉकस्टार डीएसपीचे सहकार्य निश्चित यशाचे आश्वासन देते. डीएसपीची च्या गाण्याची जादू हमखास आहे यात शंका नाही. दिग्गजां सोबत असलेला हा नवा प्रोजेक्ट नक्की काय असणार ज्याची चाहत्यांनी उत्सुकता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube