Sai Tamhankar : “समिंद्री” च ‘या’ बड्या दिग्दर्शक अभिनेत्याकडून कौतुक!

  • Written By: Published:
Sai Tamhankar : “समिंद्री” च ‘या’ बड्या दिग्दर्शक अभिनेत्याकडून कौतुक!

Sai Tamhankar : लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता फराहान अख्तर (Faran Akhtar) याने समिंद्रीच म्हणजे सईच (Sai Tamhankar) खास कौतुक केलं आहे. फराहानने सोशल मीडिया वरून स्टोरी पोस्ट करून सईच्या मानवत मर्डर्स या वेब सिरीजच खास कौतुक केलं असून तो म्हणाला ” खरंच हा शो खूप एन्जॉय केला संपूर्ण टीमच अभिनंदन”.

सईसाठी 2024 वर्ष दमदार सुरू झालं असून तिचे एकामागोमाग एक उत्तम प्रोजेक्ट्स येत आहेत आणि सई वेगवेगळ्या विषयांवर काम करताना दिसतेय. भाषा, लूक्स, भूमिका आणि अश्या अनेक गोष्टींचा अभ्यास पूर्वक विचार करून सई काम करतेय.

येणाऱ्या काळात सई वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय यात बॉलीवुड आणि मराठी प्रोजेक्ट्सचा देखील समावेश आहे. ग्राउंड झीरो, अग्नी, असंभव, डब्बा कार्टेल, गुलकंद अश्या अनेक प्रोजेक्ट्सचा ती भाग आहे.

मानवत मर्डर्स या वेबसीरिजमध्ये सईने तिच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. या वेबसीरिजमध्ये तिची भाषा आणि लूकची तर सर्वत्र चर्चा होत आहे. एका मुलाखतीमध्ये  ही भूमिका तिच्यासाठी आव्हानात्मक असा खुलासा देखील तिने केला होता. तसेच तिने या भूमिकेसाठी खूप कष्ट देखील केले असल्याची माहिती देखील तिने या मुलाखतीमध्ये दिली होती.

रंगभवनची जागा दादासाहेब फाळके चित्रनगरीला हस्तांतरित करा, महामंडळाचे उपाध्यक्ष अमोल जाधवांची मागणी 

मानवत मर्डर्समध्ये भाषा आणि लुक या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत सईने दमदार अभिनय केला आहे. त्यामुळे अनेकजण सईचं विशेष कौतुक करत आहे. तर आता  फराहान अख्तरने देखील  सईच खास कौतुक केलं आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर सईच्या मानवत मर्डर्स या वेब सिरीजच खास कौतुक करत सई आणि संपूर्ण टीमच अभिनंदन केले आहे.

कृष्णा श्रॉफने ‘पॅनल डिस्कशन’ मध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली, माझी फॅमिली…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube