…आणि म्हणून सलमान खान आणि इमरान हाश्मी ‘टायगर 3’साठी परफेक्ट जोडी ठरले!

  • Written By: Published:
…आणि म्हणून सलमान खान आणि इमरान हाश्मी ‘टायगर 3’साठी परफेक्ट जोडी ठरले!

Tiger 3 : टायगर 3 (Tiger 3) या YRF स्पाय युनिव्हर्सने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातला पण प्रेक्षकांचं अनोखं प्रेम मिळवत हा चित्रपट ब्लॉकबस्टर हीट ठरला. सलमान खान(Salman Khan), कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला त्याच्या अॅक्शन सीक्वेन्स, दमदार गाणी संगीत आणि कलाकारांच्या अभिनयासाठी कौतुक आणि तितकीच प्रशंसा मिळाली. या थ्रिलर चित्रपटात स्पाय भूमिका करणारा इमरान हाश्मी आणि सलमान खान यांची अनोखी केमेस्ट्री बघायला मिळाली आणि ही जोडी सुपरहिट ठरली.

मोठी बातमी : मोदी सरकारच्या निर्णयावर ‘सर्वोच्च’ मोहर, कलम 370 हटवणे योग्यच 

हा चित्रपट ‘एक था टायगर’ (2012) आणि ‘टायगर जिंदा है’ (2017) चा सिक्वेल आहे. सलमान खान आणि कतरिना कैफचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट’ 12 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले होते. या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत आहे आणि त्याने साकारलेल्या आतिश रेहमानच्या भूमिकेने प्रेक्षकांना चांगलचं प्रभावित केले आहे. सलमान खान आणि इमरान हाश्मीची डायनॅमिक जोडीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. त्यांच्या मधल्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सने ते दोघे कायम प्रेक्षकांना भावले आहेत.

‘चंदीगढ करे आशिकी’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! अभिषेक कपूरने शेअर केली भावनिक पोस्ट 

चाहत्यांनी टायगर 3 मधील या दोन्ही अभिनेत्यांच्या कामाचं खूप कौतुक तर केलंच. पण या दोघांच्या अनोख्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं. टायगर 3 च्या यशाने इंडस्ट्रीत एक नवीन डायनॅमिक जोडी म्हणून यांना ओळखलं जातं यात शंका नाही !

टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफसोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय, चित्रपटात हृतिक रोशन आणि शाहरुख खान यांचा कॅमिओ आहे. टायगर थ्री या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून हा चित्रपट 300 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. तर या चित्रपटाने पाचशे कोटींचा गल्ला जमवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube