सलमान खान प्रकरणात पडू नको, राखी सावंतला बिश्नोई गँगचा धमकीचा मेल
Salman Khan & Rakhi Sawant : गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्येमुळे चर्चेत आलेली बिश्नोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी या गॅंगकडून देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खान व ड्रामा क्वीन अशी ओळख असलेल्या राखी सावंत यांना जीवे मारण्याची धमकीच ईमेल आला असल्याची माहिती समोर आली आहे. राखीने या प्रकरणापासून दूर राहावे अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, असं धमकीच्या ईमेलमध्ये लिहिण्यात आले आहे.
कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून (Lawrence Bishnoi Gang) याआधी देखील बॉलिवूडचा भाईजान ओळख असलेला व अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा या प्रकरणावर अभिनेत्री राखी सावंत हिने देखील वक्तव्य केले होते. राखी म्हणाली होती की, सलमान खान हा एक दिग्गज अभिनेता आहे. त्याच्याबद्दल कुणीही वाईट विचार करू नये. सलमान खानऐवजी मी तुमची माफी मागते, असं राखी म्हणाली होती. दरम्यान राखीच्या या वक्तव्यांनंतर आता बिश्नोई गॅंगकडून राखीला धमकीचा इशारा देणारा एक ईमेल आला आहे.
नेमकं काय म्हंटले आहे ईमेलमध्ये?
सलमान खान धमकी प्रकरणापासून राखी सावंत तू दूर राहा, असा सल्ला या ईमेलमध्ये देण्यात आला आहे. तसेच राखीने या प्रकरणापासून दूर न राहिल्यास त्याचे परिणाम तिला भोगावे लागतील, असं धमकीच्या ईमेलमध्ये लिहिण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या महिन्यात ज्या व्यक्तीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचं नाव ‘रॉकी भाई’ असं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासाअंती असे समजले की, संबंधित आरोपी राजस्थानातील जोधपूर येथील रहिवाशी असल्याचं निष्पन्न झालं. आपण गोरक्षक आहोत असा दावा आरोपीनं केला आहे.
येमेनच्या राजधानीत मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत 80 हून अधिक ठार
धमकीनंतर सलमान सतर्क, खरेदी केली बुलेटप्रूफ गाडी
सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे आता सलमान खानाने देखील स्वतःच्या सुरक्षततेच्या दृष्टीने पाऊले उचलली आहे. सलमानने एक गाडी विदेशातून आयात केली आहे. विशेष म्हणजे ही बुलेटप्रूफ गाडी असून ही गाडी निसान कंपनीने बनवली आहे. विशेष बवण्यात आली असल्याने या गाडीची किंमतही तेवढीच महाग असल्याचे बोलले जात आहे.