Salman Khan : ‘हालत खराब’ म्हणत भाईजानने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Salman Khan : ‘हालत खराब’ म्हणत भाईजानने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Salman Khan shared gym photos: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सलमान खान बॉलिवूडमध्ये त्याच्या परफेक्ट बॉडीसाठी ओळखला जातो, (Salman Khan shared gym photos) त्याला रोज जिममध्ये घाम गाळायला आवडतो. (social media) यामुळेच वयाच्या ५७ व्या वर्षीही देखील तो खूपच तरुण दिसतो.

अलीकडेच, बजरंगी भाईजानने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लव्ह हेटिंग लेग्ज डे. हालत खराब’ असे लिहिले आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्नांचा काहुर निर्माण झाला आहे.

दरम्यान,  सलमान खान (Salman Khan) लवकरच आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात चाहत्यांना दिसणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत होते. हा चित्रपट २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाईजान आणि पूजा हेगडे यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे.

पूजा हेगडे तिच्या ‘जान’ची म्हणजेच भाईजानची तिच्या भावाशी (व्यंकटेश) ओळख करून देते. इथे या सिनेमाला नवे वळण मिळते. खरंतर, पूजा हेगडेच्या आयुष्यात एक खलनायक आहे, आणि हा खलनायक म्हणजे जगपती बाबू. पूजा हेगडे आणि तिच्या कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी भाईजान उचलेली आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शनचा जबरदस्त तडका आहे.

Sanjay Dutt Injured : दुखापतीनंतर संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर

यामध्ये सलमान खान जगपती बाबू आणि विजेंद्र सिंग यांना खतरनाक स्टाईलमध्ये मारहाण करताना दिसत आहे. ‘मी माणूस म्हणून माणुसकीला साथ देईन’ असं भाईजान ट्रेलरमध्ये म्हणताना दिसतोय. ‘ये हिंसा नहीं, सेल्फ डिफेन्स है’, ‘पॉवर नही, इच्छाशक्ती…’ दरम्यान, पूजा हेगडे तिच्या क्युट स्माईलने चाहत्यांची मने जिंकली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube