शिवाजी पार्कवरचा तो संच पूर्णपणे नेस्तनाबूत झाला; शिरीष कणेकरांच्या जाण्याने संजय मोने व्यथित
Shirish Kanekar death : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेची आणि साहित्याची मोठी हानी झाली. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. याबद्दल त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ( Sanjay Mone distressed due to Shirish Kanekar death )
अभिनेत्री शर्वरी शाहरुखच्या ‘कल हो ना हो’ची जबर फॅन; म्हणाली, 20 वेळा पाहिला
काय म्हणाले संजय मोने?
शिरीष कणेकर आपल्यातून गेले. अनेक वर्षे सकाळची भेट ठरलेली होती. एकंदर दहा बारा जण असायचे. साधारण तासभर गप्पा फिरून झाल्यावर व्हायच्या. त्यापैकी एकही क्षण कधीही कंटाळवाणा गेल्याचं आठवत नाही. काळाच्या ओघात काही माणसं गेली. सुधीर जोशी,गिरीश घाणेकर,अजित लोणकर, नंदू जुकर, अभिजित देसाई, राजू गोडबोले, मामा एडवणकर, गोखले, अविनाश खर्शिकर ,इसाक मुजावर आणि आज कणेकर. आमचा तो शिवाजी पार्क वरचा संचं आज पूर्णपणे नेस्तनाबूत झाला. उरला फक्त रिकामा कट्टा. पण शिल्लक राहिल्या अफाट आणि अचाट आठवणी.
शिरीष कणेकर यांना लेखक, बहारदार वक्ते, संगीतकार , नाटककार, तसेच वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लिहीणारे स्तंभ लेखक अशा एक ना अनेक गोष्टींसाठी ओळखलं जात होतं. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेसह साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या जाण्याने साहित्य, कला, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया सर्वांकडून व्यक्त होत आहे.
शिरीष कणेकर यांचा अल्पपरिचय
शिरीष कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ ला पुण्यात झाला होता. त्यांचं मुळगाव रायगड जिल्ह्यातील पेण हे आहे. त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. त्यांच्या करिअरचा लेखाजोखा मांडायचा ठरला तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी केलेली आहे. त्यामध्ये पत्रकारिता, वृत्तपत्रांमध्ये लेखन, विविध प्रकारांमध्ये ग्रंथलेखन लेखन, हिंदी चित्रपटांना संगीत देणे, नाटकांमध्ये देखील त्यांनी काम केले. त्याचबरोबर त्यांनी एकपात्री कार्यक्रमांचे लेखन,दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण केले. तसेच त्यांच्या अनेक कलाकृतींना सर्वोत्कृष्ट पारितोषिके मिळाले आहेत.