Satish Kaushik Death : …म्हणून सतीश कौशिक यांनी ‘मिस्टर इंडिया’ साठी आमिरला नाकारलं होतं

Satish Kaushik Death : …म्हणून सतीश कौशिक यांनी ‘मिस्टर इंडिया’ साठी आमिरला नाकारलं होतं

Satish Kaushik Death : सतीश कौशिक ( Satish Kaushik )  यांच्या अचानक निधनामुळे अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडाले आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने कौशिक यांचे निधन झाले. कौशिक यांच्या निधननानंतर सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानची ( Aamir Khan ) एक मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. यामध्ये आमिर खानने आपल्याला मिस्टर इंडिया या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. मात्र, कौशिक यांनी आपल्याला नकार दिला होता.

या, मुलाखतीत आमिर खानने आपल्याला मिस्टर इंडिया चित्रपटासाठी का नाकारण्यात आलं याचे कारणदेखील सांगितले आहे. आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. आमिर अगदी निवडक चित्रपट करतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

मात्र, इतर अभिनेत्याप्रमाणे कधीकाळी आमिर खानलादेखील चित्रपटांसाठी नकारांचा सामना करावा लागला होता. आमिरला अभिनयापूर्वी दिग्दर्शनात हात आजमावायचा होता आणि असेच काहीतरी करण्याच्या उद्देशाने आमिर खान मिस्टर इंडियामध्ये पोहोचला होता.

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

आमिरने 1988 मध्ये ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटापासून आमिरसाठी बॉलिवूडचे दरवाजे पूर्णपणे उघडले गेले. आमिरला करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचे होते. त्यावेळी सतीश कौशिक हे त्यांचे चीफ असिस्टंट डायरेक्टर होते.

ज्यावेळी आमिर कौशिक यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी आपण कारमधून भेटण्याासाठी गेलो होतो. त्यावेळी कौशिक यांनी आपल्याला नाकारण्याचे कारण सांगताना म्हणाले होते की, मीटिंगसाठी तू कारमध्ये आला होतास, मात्र, माझ्याकडे कार नव्हती आणि माझा ज्युनियर कारमधून येईल. त्यावेळी आमिरने ही कार आपली स्वतःची नसून काही कामासाठी घरच्यांनी काही काळासाठी दिल्याचे सांगितले होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube