शाहरूखच्या पठाणचा जलवा, जगभरातून अ‍ॅडव्हॅन्स बुकींग

शाहरूखच्या पठाणचा जलवा, जगभरातून अ‍ॅडव्हॅन्स बुकींग

मुंबई : किंग खान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची जगभरातून अ‍ॅडव्हॅान्स बुकींग सुरू झाली आहे. पठाणच्या भारताशिवाय जगभरातून होत असलेल्या अ‍ॅडव्हॅान्स बुकींगचा आकडाही कामालीचा मोठा आहे. जगभरात किंग खान शाहरुख खानचे चाहते आहेत. हे चाहते सध्या शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ अत्यंत वाट पाहत आहेत. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

एका रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि यूएईमध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या तिकिटांची अ‍ॅडव्हॅान्स बुकिंग सुरू आहे. पहिल्या दिवशी किंग खानचा पठाण पाहण्यासाठी एकट्या जर्मनीमध्ये जवळपास 9000 तिकिटांची अ‍ॅडव्हॅान्स बुकिंग झाली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात शाहरुखच्या पठाणसाठी 3000 हून अधिक तिकिटे आगाऊ बुक करण्यात आली आहेत. त्याचवेळी, यूएईमध्येही असेच दृश्य पाहायला मिळाले आहे, जिथे रिलीज होण्यापूर्वीच ‘पठाण’ची 3500 तिकिटे विकली गेली आहेत.

10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. तर येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला होता.

‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी जेमतेम काही दिवस उरले आहेत, अशा परिस्थितीत शाहरुख खानही त्याच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्याच्या तयारीत आहे. ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा स्क्रीनप्ले श्रीधर राघवन लिहिला आहे.

2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमिओ भुमिका केल्या होत्या. तर 2023 मध्ये शाहरुख खानचे चाहते त्याला मुख्य भुमिकेत पाहू शकणार आहेत. 2023 मद्ये तो एक नाही तर तीन-तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube