शिव ठाकरेचा गौतमी पाटीलसोबतच्या लग्नावर खुलासा! ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितसमोर उलगडलं फोटोमागचं गुपित

शिव सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षित यांच्यासमोर सांगणार आहे. या भागात तो गौतमी पाटीलसोबत हॉट सीटवर बसणार आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 29T111116.381

Shiv Thakare’s revelation regarding his marriage to Gautami Patil : शिव ठाकरेने एका फोटोला ‘Finally’ अशी कॅप्शन दिली आणि अनेकांना वाटलं, त्याचं लग्न झालं! त्यानंतर त्याच्या आईला नातेवाइकांचे फोन येऊ लागले आणि “आम्हाला लग्नाला का बोलावलं नाही?” या प्रश्नाला उत्तरं द्यावी लागली. एका फोटोमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आणि शिवच्या कुटुंबीयांचीही चांगलीच तारांबळ उडाली. हाच मजेशीर किस्सा शिव येत्या शनिवारी सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षित यांच्यासमोर सांगणार आहे. या भागात तो गौतमी पाटीलसोबत हॉट सीटवर बसणार आहे.

आपल्या आपुलकीच्या आणि खेळकर संवादाने गप्पांची रंगत वाढवणाऱ्या माधुरी, शिव आणि गौतमीला त्यांच्या लग्नाच्या चर्चांबद्दल विचारतात. एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र झळकल्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याबद्दल बोलताना शिव सांगतो की, त्याने गंमत म्हणून एका फोटोला ‘Finally’ अशी कॅप्शन दिली होती. मात्र, अनेकांना ती लग्नाची घोषणा वाटली आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. एका कार्यक्रमासाठी पोहोचल्यावरही ओळखीच्या लोकांनी त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. अखेर, “अहो, माझं लग्न झालेलं नाही!” असं सांगत त्याला गैरसमज दूर करावा लागला.

नागपूरमध्ये भाजपला धक्का! रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, डिलीट केलेल्या ट्विटवरून डिवचलं

हा गोंधळ केवळ शिवपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याच्या घरापर्यंतही पोहोचला. फोटो पाहिलेल्या नातेवाइकांनी त्याच्या आईला फोन करून मुलाच्या लग्नाबद्दल अभिनंदन करायला सुरुवात केली. काहींनी तर “आम्हाला लग्नाला का बोलावलं नाही?” अशी तक्रारही केली. शुभेच्छा आणि प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्यावर आईची काय प्रतिक्रिया होती, हेही शिव या गप्पांमध्ये सांगतो.

आईची प्रतिक्रिया आठवत शिव म्हणतो, “आई मला म्हणाली, ‘अरे खोडकरा! तुझ्यामुळे नातेवाइकांचे फोन येत आहेत. लग्नाला आम्हाला का बोलावलं नाही, असं विचारत आहेत!’” दुसऱ्याच दिवशी आपण याबाबत खुलासा केल्याचंही शिव सांगतो. मात्र, तोपर्यंत या फोटोमुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

या फोटोमुळे घरी उडालेल्या गोंधळाचा शिवने सांगितलेला किस्सा माधुरींसोबतच्या गप्पांमध्ये हास्याची भर घालणार आहे. गौतमीही त्याच्यासोबत हॉट सीटवर असल्याने येत्या शनिवारच्या भागात प्रेक्षकांना आणखी रंजक किस्से, हशा आणि खेळाची उत्कंठा अनुभवायला मिळणार आहे.

हत्या नव्हे, केवळ घाबरवण्याचा उद्देश…टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शूटरचा कथित दावा!

पाहा, शिव ठाकरे आणि गौतमी पाटील यांचा सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा खास भाग, या शनिवारी रात्री 9 वाजता सोनी मराठी आणि Sony LIV वर. हा कार्यक्रम दर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रसारित होतो.

follow us