Short And Sweet चित्रपटातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला; सोनाली म्हणतेय ‘मी एकटी’
Short And Sweet : शॉर्ट अॅन्ड स्वीट हा वडिल आणि मुलाच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे. मात्र यामध्ये प्रेमकथा देखील दाखवण्यात येणार आहेत. त्यातच आता चित्रपटातील ‘मी एकटी’ हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि श्रीधर वत्सर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे सुरेख गाणे आनंदी जोशीने गायले असून या रोमँटिक गाण्याचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. या संतोष मुळेकर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.
Supriya Sule : ‘त्या’ डायरीत नेमकं काय? सुळेंच्या खुलाशाने खळबळ !
या गाण्यात सोनाली कुलकर्णी श्रीधर वत्सर यांची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. त्यांच्यातील हे गोड नाते, निरागस प्रेम खूपच सुंदर आहे. गाण्याचे बोलही तितकेच मधुर आहेत. साथीदाराला भेटण्याची ओढ या गाण्यातून व्यक्त होत आहे. दरम्यान या अगोदर या चित्रपटातील ‘मन मतलबी’ हे भावनाप्रधान गाणे प्रदर्शित झाले होते.
https://youtu.be/MNBfb-dS2ag?si=AmDJLXp5wLl7z4o4
या गाण्याबद्दल दिग्दर्शक गणेश कदम म्हणतात, ‘आज या चित्रपटातील दुसरे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. साथीदाराबद्दल असलेली प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहे. हे सुंदर गाणे नक्कीच सगळ्यांना आवडेल. नवरा बायकोच्या एकत्र बसून गप्पा मारणे, जेवण बनवणे, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करण्यातली एक गंमत, भावनिक क्षण या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. यातूनच खरं प्रेम बहरते. मंगेश कांगणे यांचे बोल आणि संतोष मुळेकर यांचे संगीत आणि त्याला लाभलेला आनंदी जोशीचा आवाज हे समीकरण खूप मस्त आहे.’
Nana Patole : दिल्ली अन् गुजरातवरून चालणारं हे आउटसोर्सिंग सरकार; नाना पटोलेंचा घणाघात
शुभम प्रोडक्शन निर्मित, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.