आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात श्रीकांत यादव यांचा रोमॅण्टीक अंदाज दिसणार, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

  • Written By: Published:
आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात श्रीकांत यादव यांचा रोमॅण्टीक अंदाज दिसणार, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Ilu Ilu marathi movie : दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाच्या जोरावर श्रीकांत यादव यांनी मनोरंजनसृष्टीत खास ओळख निर्माण केली हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या नजरेत भरल्या आहेत. (movie ) या अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात दिसणार आहे. ग्लॅमरस अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिच्या सोबत त्यांचा धमाल लव्ह ट्रॅक पाहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग ; ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार नाट्यगृहात प्रदर्शित

अभिनेते श्रीकांत यादव सांगतात, ,मिलिंद सुर्वे ही व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. आपलं पहिलं प्रेम अचानक समोर आल्यावर माझी अवस्था काय होणार? याची धमाल या चित्रपटात पहाता येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि मीरा आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय केल्याचं हे दोघे सांगतात. या दोघांसोबत बॉलीवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, निशांत भावसार, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. चित्रपटात त्यांचा रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube