Fighter Shooting: सिद्धार्थ आनंद यांनी शेयर केली ‘फायटर’च्या शुटिंगची पहिली झलक
Fighter poster: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan), अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या फायटर (Fighter) या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडिया (Social media) रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा लूक दिसत आहे. फायटर हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
तसेच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अलीकडेच फायटर ची पडद्यामागील झलक शेयर केली आणि प्रेक्षकांना या बहुचर्चित प्रोजेक्ट्ची खास झलक दाखवली. या रोमांचक BTS ने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे, या सिनेमाच्या रिलीजची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आनंद इटलीमध्ये आगामी एरियल अॅक्शन चित्रपटासाठी डान्स शूटिंग करत असताना त्याने एक खास फोटो शेयर केला होता. फायटरची रिलीज डेट जवळ येत असताना चाहत्यांना या अॅक्शन-पॅक्ड चित्रपटातील उत्कंठावर्धक कथा आणि उल्लेखनीय कामगिरीचे साक्षीदार होण्याचा उत्साह वाढला आहे.
फायटर या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केल आहे. हृतिकने याअगोदर सिद्धार्थसोबत ‘वॉर’ या सिनेमामध्ये काम केले आहे. तर दीपिकानं सिद्धार्थच्या ‘पठान’या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या सिनेमाना चाहत्यांची मोठी पसंती मिळते. त्याचा पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ मधील अनोखा अंदाज पाहिलात का?
पठाण सिनेमात दीपितासोबतच किंग खान खान, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे. आता सिद्धार्थच्या फायटर या सिनेमाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. फायटर मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत आणि 25 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.