Ranragini Silver Jubilee : महाराणी ताराराणींची गाथा सांगणारं रणरागिणीचा रौप्य महोत्सव संपन्न
Ranragini Silver Jubilee : प्रेक्षकांकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळणे, हे कोणत्याही कलाकृतीसाठी, कलाकारांसाठी खूप महत्त्वाची बाब असते
Ranragini Silver Jubilee : प्रेक्षकांकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळणे, हे कोणत्याही कलाकृतीसाठी, कलाकारांसाठी खूप महत्त्वाची बाब असते. त्यातही रौप्यमहोत्सवी प्रयोग हे कलाकृती सादर करणाऱ्या टीमसाठी मनोबल उंचावणारं असतं. स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची किंबहुना भारताची सर्वश्रेष्ठ ‘सम्राज्ञी’ असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा सांगणारं रणरागिणी ताराराणी हे नाटक रंगभूमीवर आलं.
युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं असून नुकताच या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग संपन्न झाला. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने आलेल्या रणरागिणी ताराराणी नाटकाची निर्मिती सरस्वती एज्युकेशन सोसायटी यांची आहे.
या रौप्यमहोत्सवी (Ranragini Silver Jubilee) प्रयोगाला आनंद कुलकर्णी, अजय कोचळे, दिग्दर्शक संभाजी सावंत, श्री छञपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्टचे संचालक ॲड.सुहास घाग, ज्ञानेश महाराव, जज तायडेसाहेब, दिग्दर्शक विवेक देशपांडे, अभिनेते उमेश जगताप, भाजप नेते प्रमोद जठार, संगीतकार श्रीरंग आरस आदि मान्यवर उपस्थित होते.
Rajan Patil Exclusive Interview : शरद पवारांची साथ का सोडली? राजन पाटील स्पष्टच म्हणाले
मराठेशाहीचे स्थैर्य आणि छत्रपती ताराराणी यांनी समर्थपणे राखलेली मराठेशाहीची गादी यावर आधारित असलेल्या रणरागिणी ताराराणी या नाटकात 50 कलाकारांची फ़ौज आहे.
