Abhijeet Sawant : ट्रीप एक कलाकार अनेक; गायक अभिजीत सावंतची स्टार स्टड दुबई ट्रीप

Abhijeet Sawant : इंडियन आयडॉल फेम गायक अभिजीत सावंत कामानिमित्तानं अनेक ठिकाणी फिरतीवर असतो अश्यातच अभिजीत नुकताच दुबई

  • Written By: Published:
Abhijeet Sawant

Abhijeet Sawant : इंडियन आयडॉल फेम गायक अभिजीत सावंत कामानिमित्तानं अनेक ठिकाणी फिरतीवर असतो अश्यातच अभिजीत नुकताच दुबई ट्रीपला गेला होता आणि ही ट्रिप त्याचासाठी एका कारणाने खूप खास तर ठरली पण त्याचा सोशल मीडिया पोस्टने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिजीतला ट्रीप सुरू होताच फ्लाईट मध्ये  बॅड्स ऑफ बॉलिवूडचे (Bads of Bollywood) दोन मुख्य कलाकार भेटले.

लक्ष्य आणि रजत बेदी (Rajat Bedi) यांची भेट होताच पुढे अभिजीतला या ट्रीप मध्ये अनेक कलाकार भेटत गेले. कायम सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अभिजीतने (Abhijeet Sawant) इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून त्याला एक लक्षवेधी कॅप्शन सुद्धा दिलं “ एक ट्रीप आणि कलाकार अनेक ” अस म्हणत अभिजीतने त्याची फॅन बॉय मोमेंट शेयर केली आहे.

अभिजीत सावंत हा कायम चर्चेत असलेला गायक असून आणि आता त्याचा या स्टार स्टड पोस्ट ने प्रेक्षकांच्या भूया उंचावल्या आहेत. लक्ष्य, रजत बेदी, अर्शद वारसी, कॉमेडीयन रवी गुप्ता, गायक नीरज श्रीधर अश्या अनेक कलाकारांच्या भेटी या दुबई ट्रीप मध्ये झाल्याचं दिसतंय.

Larissa Brazilian Model : मी कधीही भारतात…, व्होट चोरीवर ब्राझिलियन मॉडेलचा धक्कादायक दावा

येणाऱ्या काळात अभिजीत अजून काय वैविध्यपूर्ण गाणी प्रोजेक्ट्स करणार का? किंवा या भेटी कामाच्या निमित्तानं झाल्यात का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत लवकरच अभिजीत काहीतरी खास घेऊन येणार असल्याचं कळतंय.

follow us