Nitin Desai Death : देसाईंनंतर…महानोर…असा कसा नियतीचा खेळ…! सोनालाची भावूक पोस्ट

Nitin Desai Death : देसाईंनंतर…महानोर…असा कसा नियतीचा खेळ…! सोनालाची भावूक पोस्ट

Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आज प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. त्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक भावूक पोस्ट केली आहे. त्यात तिने या दोघांची एक सामन धागा असणारी आठवण शेअर केली आहे. ( Sonali Kulkarni post on Nitin Desai Death and Veteran Writer Poet N D Mahanor Passed Away )

मधकेंद्र योजनेच्या लाभासाठी अर्ज करा; ग्रामोद्योग मंडळाचं आवाहन

काय आहे सोनालीची पोस्ट?

नितीन देसाई आणि ना. धों. महानोर या दोघांची एक सामन धागा असणारी आठवण शेअर करताना लिहिले की, ‘कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना.धों.महानोर…असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…!माझ्या आयुष्यात ज्यांनी ‘अजिंठा’ आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक ना. धों. महानोर आज आपल्यात नाही. पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील. आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

पुढे सोनाली म्हणाली, नितीन देसाई यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… ना. धों. महानोर यांना ‘अजिंठा’ या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं ‘अजिंठा’ नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. ‘जैत रे जैत’ ते ‘अजिंठा’ ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली.

Hariyana Violence : ‘जमावाने दिल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा’, एफआयआर दाखल…

यावेळी तिने एक फोटो देखील शेअर केला आहे. तो फोटो अंजिंठा चित्रपटाच्या पहिल्या प्रेस कॉन्परन्सच्या वेळी काढण्यात आला होता. असं सोनालीने सांगितलं. तसेच हा फोटो देसाईंच्या एनडी स्टुडिओमध्ये काढण्यात आला होता. या दोघांच्या जाण्याने शेवटी हेच कळत की, तीन गोष्टी महत्वाच्या असतात त्या म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीवर कीती प्रेम करता? तुम्ही कीती हळूवारपणे जगता? तुम्ही महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींकडे कसं दुर्लक्ष करता. असं म्हणत सोनालीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube