डिओरची पहिली दक्षिण आशियाई एम्बेसडर म्हणून सोनम कपूरची निवड; ‘आयशा’मधील फॅशन लुक्स चर्चेत
Sonam Kapoor ambassador of Dior : प्रसिद्ध फ्रेंच लक्झरी ब्रँड डिओर ने काल सोनम कपूरला आपला एम्बेसडर म्हणून घोषित केलं आहे. ती या ब्रँडसाठी पहिली दक्षिण आशियाई जागतिक एम्बेसडर ठरली आहे. (Sonam Kapoor ) या घोषणेनंतर, सोनमच्या चाहत्यांनी 2010 च्या आयशा चित्रपटातील तिच्या डिओर लुकच्या थ्रोबॅक फोटोंनी सोशल मीडियावर एकच लाट आली. यामध्ये सोनम डिओरच्या हँडबॅगसह खरेदी करताना दिसत आहे.
25 वर्षांच्या सोहळ्याला एक दिवस थोडीच पुरणार! झी मराठी अवॉर्ड्स या दिवशी होणार मोठ्ठं सेलिब्रेशन
आयशापासून डिओरसोबतच्या आपल्या दीर्घकालीन नात्यावर बोलताना सोनम कपूर म्हणाली, “डिओर आणि माझे नाते जणू अगदी नियतीने बांधले होतं. आयशा आमच्या सहकार्याची पायाभरणी घालणारा मोठा टप्पा ठरला. मी जेव्हा फॅशनला गंभीरतेने पाहायला सुरुवात केली, तेव्हापासूनच मी डिओरची मोठी चाहती आहे. आयशामध्ये, रिया आणि मी डिओरच्या फॅशनवरील प्रभावाला आदराने पाहिलं असंही ती म्हणाली आहे.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी डिओर माझ्यासोबत होता. म्हणून, डिओरच्या पहिल्या दक्षिण आशियाई जागतिक एम्बेसडर पदाची ही यात्रा माझ्यासाठी खरंच पूर्ण झालेलं एक वर्तुळ आहे. ब्रँडचा इतिहास आणि त्याची दृष्टी समजून घेणाऱ्या डिओरच्या या सन्मानाने मी कृतज्ञ आहे असंही ती म्हणाली. भारताच्या फॅशनच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर, डिओरसोबतच्या या नवीन संबंधाने एक नवीन उंची गाठते आहे. तिच्या या भूमिकेतून ती फॅशनचे नवे सीमारेषा कशा ओलांडते, हे पाहण्यासाठी आपल्याला निश्चितच उत्सुकता आहे.