Fateh Movie : सोनू सूदने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट, ‘फतेह’बद्दल केली मोठी घोषणा

Fateh Movie : सोनू सूदने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट, ‘फतेह’बद्दल केली मोठी घोषणा

Sonu Sood Fateh Release Date: बॉलीवूडचा (Bollywood) शक्तिशाली अभिनेता आणि ‘गरिबांचा मसिहा’ सोनू सूद (Sonu Sood) आज 30 जुलै रोजी त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी मित्र अभिनेत्याचे अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी सोनू सूदने त्याच्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून त्याच्या आगामी ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘फतेह’ ची (Fateh Release Date) रिलीज डेटही जाहीर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


यासोबतच सोनूने स्वतःचा आणि चित्रपटातील मुख्य अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez) फर्स्ट लूक पोस्टरही शेअर केला आहे. सोनू सूद बऱ्याच दिवसांपासून फतेह या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनू सूदनेच केले आहे.

‘फतेह’ कधी रिलीज होणार?

झी स्टुडिओच्या बॅनरखाली बनलेल्या ‘फतेह’ चित्रपटाचे दिग्दर्शन सोनू सूदनेच केले आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असून जॅकलिन फर्नांडिस ही महिला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनू सूदने अखेर आज 30 जुलै रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘फतेह’ची रिलीज डेट जाहीर केली आहे. पुढील वर्षी 10 जानेवारी 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांसाठी रिटर्न गिफ्ट पोस्ट शेअर करताना सोनूने लिहिले आहे की, ’10 जानेवारीला देशातील सर्वोत्कृष्ट ॲक्शन फिल्मसाठी तयार राहा. झी स्टुडिओने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘फतेहसह नेत्रदीपक, न पाहिलेल्या, ॲक्शन पॅक्ड अनुभवासाठी स्वत:ला तयार करा’.

Sonu Sood: चाहत्यांकडून सोनूला मिळालं अनोखं गिफ्ट,’थेट 1500 किमी धावत आला आणि….’

कसा आहे फर्स्ट लुक पोस्टर?

‘फतेह’ चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर करण्यात आले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये सोनू सूद समुद्र किनारी सूट आणि बूट घालून हातात बॅग घेऊन उभा आहे. त्यांच्या मागे एक लोखंडी पूल दिसतो. चित्रपटाच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस दिसत आहेत. दुस-या पोस्टरमध्ये जॅकलीन नर्व्हस आणि सोनू एका इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube