Spider-Man: Brand New Day ची दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार पकड; 422 कोटी रुपयांची कमाई
Spider-Man: Brand New Day : सोनी पिक्चर्स इंडियाच्या 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी सुरू आहे. पहिल्या दिवशी
Spider-Man: Brand New Day : सोनी पिक्चर्स इंडियाच्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी सुरू आहे. पहिल्या दिवशी आणि पहिल्या आठवड्याच्या शेवटी (ओपनिंग वीकेंड) विक्रमी कमाई केल्यानंतर, टॉम हॉलंडची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अवघ्या आठ दिवसांत 400 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी, ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने 422 कोटी रुपयांची एकूण कमाई (GBOC) नोंदवली असून त्याची घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 18.5 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट लवकरच 450 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
एकूण कमाई
दिवस 1- 73 कोटी रुपये
दिवस 2 शुक्रवार – 58.4 कोटी रुपये
दिवस 3 शनिवार – 85 कोटी रुपये
दिवस 4 रविवार – 93 कोटी रुपये
दिवस 5 सोमवार – 28 कोटी रुपये
दिवस 6 मंगळवार – 26.3 कोटी रुपये
दिवस 7 बुधवार – 22 कोटी रुपये
दिवस 8 गुरुवार – 18 कोटी रुपये
दिवस 9 शुक्रवार – 18.5 कोटी रुपये
एकूण: 422 कोटी रुपये (Gross)
बॉलिवूडची बिझनेस लीग ‘हे’ सात स्टार्स ज्यांनी स्टारडमचे यशस्वी ब्रँड्समध्ये रूपांतर केले
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ या आठवड्याच्या शेवटीही बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाला केवळ इंग्रजी आवृत्तीसाठीच नाही, तर प्रादेशिक आवृत्त्यांसाठीही प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, यामुळे विविध भाषांमधील चाहते एकत्र आले आहेत.