Sudhir Phadke Biopic : महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, नवा टिझर रिलीज

Sudhir Phadke Biopic : महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, नवा टिझर रिलीज

Sudhir Phadke Biopic Teaser: ज्यांच्या अवीट सुरांनी सर्वांनाचं वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे, त्याचं बाबुजींचा आयुष्यपट लवकरच मोठा पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) नुकताच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Sudhir Phadke Biopic Teaser) या मराठी सिनेमाचा दुसरा टिझर रिलीज झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या सिनेमातून उलगडणार आहे.

टीझरमध्ये ‘माझ्या आयुष्यामधील खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते, असे एक घोषवाक्य आहे. या वाक्यातून ‘बाबुजीं’च्या व्यक्तिमत्वाची मोठी ओळख होते. रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या सिनेमाचे निर्माते आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा सिनेमा 1मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक असणार आहे.

Swatantrya Veer Savarkar: ‘रणदीप हुड्डा’ यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा मराठी ट्रेलर रिलीज

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ” एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. ‘बाबुजी’ हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता. यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी कळल्या, ज्या अनेकांना माहित नाही. त्यांचे तेच आयुष्य मी मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. त्यांची गायली आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यामागचा संघर्ष नेमका होता. त्यांचा हा संघर्षमय प्रवास ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये बघायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube