Sunny Leone : ‘ड्रीम गर्ल’ सनी लिओनीसाठी झाली गर्दी; फोटो पाहून तुमचेही डोळे फिरतील

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 12T172113.585

Sunny Leone: सनी लिओनीचे (Sunny Leone) काही फोटो ट्विटरवर सध्या खूपच व्हायरल (Viral) होत आहेत. ती सध्या केरळमध्ये आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते रस्त्यावर उतरले आहेत. मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे सनीच्या पांढऱ्या कारशेजारी झालेली प्रचंड गर्दी दिसत आहे. ट्विटरवर हे फोटो (Photo) समोर आली असून हे तिच्या केरळ दौऱ्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

या कारणामुळे सनी ट्विटरवर सध्या ट्रेंड (Twitter Trending ) होत आहे. नक्की या फोटोंमागचे सत्य काय आहे. सनी कोचीला पोहोचली तेव्हाचे हे सर्व फोटो असल्याची माहिती मिळाली आहे. सनीची केरळमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि त्याची छोटीशी झलक कोचीमध्ये बघायला मिळाली आहे. सनीचे हे फोटो कोचीच्या एमजी रोड येथील आहेत, जिथे ती स्मार्टफोन शाखेच्या उदघाटन सोहळ्यासाठी पोहोचली होती.

सनीचे हे फोटो आताचे नसून खूप जुने असल्याचे सांगितले जात आहे. सनी लिओनीला बघण्यासाठी झाली असलेली ही गर्दी २०१७ मधील आहे. या गर्दीला सनी लिओनीने ‘वादळ’ असे नाव कॅप्शन दिले होते. सनीला लिओनीला बघण्यासाठी एमजी रोडवर मोठी गर्दी झाली होती. सनीने स्वत: या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला आहे, कोचीच्या चाहत्यांचे आभार मानताना माझ्याकडे शब्द नसल्याचे ती म्हणाली होती.

लोकांचे हे प्रेम आणि पाठिंबा बघून मला आश्चर्य वाटत आहे आणि त्यांचं हे प्रेम कधी देखील विसरू शकणार नाही, असेही तिने यावेळी सांगितले आहे. सनीने तो फोटो देखील शेअर केला होता, ज्यामध्ये तिची कार एका मोठ्या गर्दीमध्ये अडकली असल्याची दिसून येत आहे.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

मात्र, या चाहत्यांच्या गर्दीची तुलना सनीने लिओनीने प्रेमाच्या सागराशी केली होती. एवढेच नाही तर जेव्हा सनी लिओनी स्टेजवर होती, तेव्हा लोकांनी जमेल तसे तिचे सेल्फी फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube