शॉर्ट अॅंड स्वीट या कौटुंबिक चित्रपटाचा स्वीट टीझर लॉंच, सोनाली कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत
Short and Sweet Teaser Out : गेल्या काही दिवसांपासून नवनवीन विषयांवर आधारित अनेक मराठी चित्रपट (Marathi movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेड’ या चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचं म्हटलं जातं. आता लवकरच ‘शॉर्ट अँड स्वीट’ (Short and Sweet) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला.
‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. कारण, 1 मिनिट 5 सेकंदाच्या टीझरमध्ये एकाच घरात राहणाऱ्या लोकांसोबत अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. ‘आयुष्य आपल्याला सधी देत नाही, आपण आयुष्याला संधी द्यायची’ हा चित्रपटातील डॉयलॉग सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Pankaja Munde : विधानपरिषदेचा फॉर्म भरला पण, मला.. पंकजांनी सांगितलं तेव्हा काय घडलं?
चित्रपटाच्या टीझरवरून कळते की, इतक्या वर्षांनी घरी परतेला संजू आपल्या वडिलांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसतंय, पण त्यांना भेटल्यावर तो अस्वस्थ का झाला, कोण आहेत संजूचे बाबा, नेमकं काय कारण असेल, ज्यामुळं संजूच्या आईने त्याच्यापासून ही गोष्ट लपवली, हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ‘शॉर्ट अँड स्वीट’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून नावाप्रमाणेच स्वीट अशी ही कथा आहे. चित्रपटाच्या टीझरवरून एकंदर चित्रपटाच्या कथेबद्दल अंदाज आलाच असेल. ताकतीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारे श्रीधर वाटसर व मालिकेतून घरांघरांत पोहोचलले हर्षद अतकर व रसिका सुनील यांसारख्या कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. याच बरोबर यूट्यूबर आणि रील विश्वातील तुषार खैर व कॉमेडी किंग ओमकार भोजणे ही पाहायला मिळतील. मनोरंजनात्मक तसेच संवेदनशील असा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शुभम प्रॉडक्शन प्रस्तुत ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश दिनकर कदम यांनी केले आहे. पायल गणेश कदम आणि विनोद राव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन स्वप्नील बारस्कर यांनी केले असून छायाचित्रण राहुल जाधव यांनी केले आहे.