तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर ‘अरनमनाई 4’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर ‘अरनमनाई 4’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Aranmanai 4 OTT Release date: दक्षिण आणि बॉलीवूडमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) नुकतचं ‘अरनमानाई 4’ मध्ये (Aranmanai 4) दिसली. या कॉमेडी हॉरर चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बॉक्स ऑफिसवरही (box office) त्याने उत्तम कमाई केली. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहणे चुकवले आहे. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘अरनमाई 4’ आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तमन्ना भाटिया स्टारर हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो चला तर मग जाणून घेऊया…?

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)


‘अरनमानाई 4’ कधी आणि कुठे रिलीज होणार?

‘अरनमानाई 4’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या तमिळ चित्रपटांपैकी एक आहे. नुकतचं या चित्रपटाची हिंदी आवृत्तीही प्रदर्शित झाली. ‘अरनमानाई 4’ नेही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत 100 कोटी रुपयांची कमाई केली. आता हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवरही पाहता येणार आहे.21 जूनपासून डिस्ने हॉटस्टार रिलीज होणार आहे.

रविवारी, डिस्ने+ हॉटस्टारने ‘अरनमानाई 4’ च्या ओटीटी रिलीजची घोषणा केली आणि लिहिले आहे की, ‘लवकरच येत आहे. तमिळ व्यतिरिक्त, हॉरर-कॉमेडी चित्रपट तेलुगू, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये पाहता येणार आहे.

‘अरनमानाई 4’ची स्टार कास्ट

तमन्ना आणि राशिशिवाय सुंदर सी, कोवई सरला, योगी बाबू, वेनेला किशोर, श्रीनिवास रेड्डी, सुनील आणि केएस रविकुमार यांसारख्या अनेक स्टार्सनी ‘अरनमानाई 4’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सुंदर सी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांनी अवनी सिनेमॅक्स आणि बेन्झ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली केली आहे.

Aranmanai 4 च्या यशाने राशीचं भविष्य उजळलं; बॉक्स ऑफिसवर केली हॅट्रीक

काय आहे ‘अरनमानाई 4’ची कथा?

या चित्रपटाची कथा साथियाभोवती फिरते जी आपल्या बहिणीच्या संशयास्पद मृत्यूमागील लपलेले सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत आहे. या काळात भयानक घटना घडू लागतात. आता साथियाला त्याच्या बहिणीच्या मृत्यूचे कारण कळेल की नाही, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की ‘अरनमानाई 4’ 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. सुमारे 35 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज