‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर रिलीज, अंकुशच्या भूमिकेनं वेधलं लक्ष
मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा टीझर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते रीलीज झाला. यावेळी राज ठाकरे यांनी शाहीर साबळे यांच्या आठवणींन उजाळा दिला.
यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.
मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर ज्यांनी जपला, मराठी लोकसंगीत, लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्यामुळे पोहोचली, त्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे. विशेष म्हणजे शाहीर साबळे यांची नात सना शिंदे या चित्रपतमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सना शिंदे ह्या शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे, तर अंकुश चौधरी हे शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात दिसत आहेत. टीझरमधील अंकुशच्या विविध लुक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा टीझर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.
टाटा समूहाने Bisleri खरेदी करण्यास नकार; जयंती चौहान स्वीकारणार ‘या’ कंपनीची जबाबदारी
या टीझरची सुरुवात अंकुश साकारत असलेल्या शाहीर साबळे यांची झलक दिसण्यापासून होते. तर त्या पाठोपाठ या टीझरमध्ये शाहीर साबळेंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि दिग्गज व्यक्ती या दिसत आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर यांचा समावेश आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास मेजवाणी ठरणार आहे.
शाहिरांचा जीवनप्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी केदार शिंदे हे गेल्या १५ वर्षांपासून या तयारी करत आहेत. दरम्यान, आता हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षक भारावले आहेत. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला मिळणार हे मात्र नक्की.
टीझर पाहा :