‘आमी डाकिनी’साठी जावेद अलींचं शीर्षक गीत; मालिका ‘या’ तारखेपासून होणार प्रसारित

Mumbai News : ‘आहट’नंतर आता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे एक नवे आणि रहस्यांनी भरलेले कथानक ‘आमी डाकिनी’. कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका प्रेम, विरह आणि सूडाच्या प्रवासाची कहाणी मांडते. या सर्वाच्या केंद्रस्थानी आहे डाकिनी जी आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध करते, शांततेने घाबरवते आणि निर्दयतेने संहार करते.
या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी प्रथमच संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यांनी मालिकेच्या शीर्षक गीताची संगीतरचना केली आहे. आपल्या भावस्पर्शी आणि बहुरंगी आवाजासाठी ओळखले जाणारे जावेद अली यांनी ‘आमी डाकिनी’साठी साकारलेले हे गीत मालिकेच्या भावनिक गाभ्याशी पूर्णपणे सुसंगत आहे. त्यांचे संगीत प्रेक्षकांना कथेतल्या उत्कटतेची आणि गूढतेची झलक देते.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनसाठी जावेद अली यांचे हे पहिले संगीतकार म्हणूनचे योगदान असून त्यांच्या यशस्वी करिअरमधील हा एक नवा आणि महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ‘आमी डाकिनी’ येत्या २३ जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि Sony LIV वर प्रसारित होणार आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ने देशाची मानसिकता बदलली; विवेक अग्निहोत्रींचा भावनिक अनुभव
खरंतर आमी डाकिनी वेळ आणि जीवनाच्या पलीकडं जाणारी प्रेम कहाणी आहे. कधी काळी डाकिनीचं कुणीतरी हक्काचं होतं. अनेक जन्मांपासून ती त्या प्रेमासाठी व्याकूळ झाली होती याच प्रेमाला परत मिळवण्यासाठी तिचा प्रयत्न असतो. या मालिकेतील कथा डाकिनीभोवती फिरते. जी एक दृढनिश्चयी महिला आहे. आपल्या हरवलेल्या पतीचा शोध घेण्याचा डाकिनीचा प्रवास आहे.