‘The Kerala Story’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन रुग्णालयात दाखल, काय झालं नेमकं?

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 27T122906.265

The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचा वाद चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) २०० कोटींहून जास्त प्रमाणात कमाई केली आहे. (Directed by Sudipto Sen) तसेच या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळून देखील हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. काही राज्यांमध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. आता सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुदीप्तो सेन यांची तब्येत बिघडली आहे, तर त्यांना रुग्णालयात भरती देखील करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुदीप्तो सेन यांची सतत होत असलेल्या प्रवासामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सिनेमाचे प्रमोशनही थांबवण्यात आले आहे. अनेक दौरेही रद्द करण्यात आले आहेत. सुदीप्तो सेन यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर १० शहरांमध्ये ‘द केरला स्टोरी’चा प्रचार करण्याची योजना आखली होती.


सुदिप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल शाह निर्मित, ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला प्रदर्शनाअगोदर मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये या सिनेमावर बंदी घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर पश्चिम बंगालमधील सिनेमावरील बंदी हटवण्यात आली आहे. हा सिनेमा आता पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होत आहे.

Kiran Mane Post: किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘तू पाटलीण…’

सिनेमाने आत्तापर्यंत भारतात २१६.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर सिनेमाने २५० कोटीपेक्षा जास्तीचा गल्ला कमावला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ या सिनेमाच्या प्रदर्शनावर काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)च्या युथ लीगने बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर अनेक जण या सिनेमाला ‘प्रोपगंडा सिनेमा’ म्हणत असल्याचे सांगितले जात आहे.

या सिनेमावर होणाऱ्या या टीकेमुळे या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला ३२ हजार महिलांचा आकडा बदलण्यात आला आहे. ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. आणि तसेच याबरोबरच सेन्सॉर बोर्डाने या सिनेमामध्ये १० बदल करण्यास सांगितले होते. अदा शर्मा या चाहत्यांना सिनेमात प्रमुख भूमिका साकारत असताना दिसली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube