The Kerala Story : केरळमधील मशिदीत हिंदू जोडप्याचं लग्न; ए आर रेहमान यांनी शेअर केला व्हिडीओ
The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तर दुसरीकडे या चिञपटावर (Cinema) जोरदार टीका होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे. तर दुसरीकडे काहीजण या चित्रपटाचे कौतुक देखील करत आहेत.
Bravo 🙌🏽 love for humanity has to be unconditional and healing ❤️🩹 https://t.co/X9xYVMxyiF
— A.R.Rahman (@arrahman) May 4, 2023
आता केरळमधील एका मशिदीमध्ये एक हिंदू जोडपं (Hindu couple) लग्नबंधनात अडकले असल्याचा व्हिडिओ संगीतसम्राट ए.आर. रेहमान (A. R. Rahman) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ए. आर. रेहमान यांनी हिंदू जोडप्याच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ शेअर ( Wedding Video) केला आहे. या व्हिडीओत हिंदू जोडपे मशिदीमध्ये लग्न करत असल्याचे दिसून येत आहे.
ए. आर. रेहमान यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर, हे बघा केरळची आणखी एक स्टोरी’. ए. आर. रेहमान यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्या व्हिडिओला कॅप्शन दिले लिहिलं आहे,”शाब्बास… मानवतेवरचं प्रेम बिनशर्त असलं पाहिजे. हिंदू जोडप्याच्या लग्नसोहळ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. वधूच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना लग्नाचा खर्च करणे परवडत नाही.
https://www.youtube.com/watch?v=udoCRDjqxv8
मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने केरळच्या अलप्पुझा शहरातील एका मशिदीमध्ये या जोडप्याच्या लग्नाची व्यवस्था करण्यात आली होती. आणि या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर सध्या जोरदार टीका होत असताना ए.आर. रेहमान यांनी हिंदू जोडप्याच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ शेअर केल्याने आता त्यांनादेखील ट्रोल केले जात आहे.
एमटीव्ही रोडीजचा धमाकेदार प्रोमो जारी…रिया चक्रवर्ती दिसणार अॅक्शन मोडमध्ये
या जोडप्याच्या कृतीचे कौतुक केल्याने ते सध्या जोरदार चर्चेत येत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या चित्रपटावर मोठं वक्तव्य केले होते. हा चित्रपट आरएसएसचा अजेंदा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.