नीरज पांडेंचा आगामी चित्रपट ‘औरों में काहा दम था’ चं शुटींग सुरू

Untitled Design   2023 02 06T170021.220

मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक नीरज पांडे हे त्यांच्या ए वेन्सडे, स्पेशल 26, एम एस धोनी या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता त्यांच्या आगामी चित्रपट ‘औरों में काहा दम था’ चं शुटींग सुरू झालं आहे. हा त्यांचा 6 वा चित्रपट आहे. तर फ्रायडे फिल्मवर्कचा तो 15 वा चित्रपट आहे.

यामध्ये अजय देवगण आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत आहेत. ही एक म्युझिकल प्रेमकथा आहे. एका महाकाव्यावर आधारित हा चित्रपट आहे. तर सुप्रसिद्द संगीतकार एम एम करीम हे या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन करणार आहेत.

जिमी शेरगिलसह मुख्य स्टारकास्टसह शनिवारी या चित्रपटाचं ‘औरों में काहा दम था’ चं शुटींग सुरू झालं आहे. मुंबईत त्याचे विस्तृत चित्रीकरण केले जाईल.

एनएच स्टुडिओ प्रस्तुत, फ्रायडे फिल्मवर्क्स प्रोडक्शन, औरों में कहां दम था! शितल भाटिया, नरेंद्र हिरावत, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि कुमार मंगत पाठक (पॅनोरमा स्टुडिओ) निर्मित आहे.

Tags

follow us