Tiger 3 घेऊन येत सलमान-कॅटरिनाने दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा !

Tiger 3 घेऊन येत सलमान-कॅटरिनाने दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा !

Tiger 3 : टायगर 3 (Tiger 3) निमित्त सलमान-कॅटरिनाने चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. (Social media) आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

‘अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्या’; जरांगेंनी वडेट्टीवारांना सांगितली सत्य परिस्थिती

टायगरच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपट मालिकांमध्ये एक यशस्वी आणि एव्हरग्रीन जोडी म्हणून सलमान आणि कॅटरिनाकडे पाहिलं जातं. तर आतापर्यंत त्यांचा कोणताही चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज झाला नव्हता. त्यामुळे सलमान कॅटरिनाचा टायगर 3 हा पहिला चित्रपट असणार आहे. जो दिवाळीला रिलीज होणार आहे.

‘विरोधी पक्षनेत्याला स्वत:च्या जातीचा गर्व झालायं’; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

या निमित्त त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान म्हणाला की, दिवाळीला चित्रपट रिलीज होणे खास आहे. कारण माझ्यासाठी हा सण नेहमीच एक आशीर्वाद राहिला आहे. मी आणि कॅटरिनाने सर्वांच्या प्रेमामुळे चित्रपटाचं शुटींग पुर्ण केलं आहे. त्यामुळे दिवाळीत हा चित्रपट रिलीज करताना आमचं मन भरून आलं आहे.

Work From Home च्या जाळ्यात अडकताय? युवकाला घातला लाखोंना गंडा

तर यावेळी कॅटरिना म्हणाली की, दिवाळी ही अत्यंत खास आहे. कारण आमचा चित्रपट येत आहे. आमचा हा एक प्रयत्न आहे. ज्यातून आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहोत. त्यांची दिवाळी आणखी खास बनवणार आहोत. तर या चित्रपटाच्या माध्यमातून ही दिवाळी आम्ही सर्व देशवासीयांसोबत साजरी करणार आहोत. आपेक्षा आहे की, हे प्रेक्षकांना एक खास गिफ्ट ठरेल. अशा भावमना यावेळी कॅटरिनाने व्यक्त केल्या.

हा सिनेमा रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. टायगर 3 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्याच्या रिलीजच्या नऊ दिवस आधी कतरिना कैफ आणि सलमान खान ने त्यांच्या चाहत्यासाठी खास भेट आणली आहे. या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असल्याने सोशल मीडियावर आधीच प्रचंड चर्चा निर्माण केली आहे आणि हा नवा प्रोमो केवळ उत्साह वाढवतो. या ट्रेलरमध्ये कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्यातील तडफदार केमिस्ट्री अधिक ठळक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube