Times 100 Most Influential Peoples च्या यादीत भारताच्या साक्षी आणि आलियाला मिळालं स्थान

Times 100 Most Influential Peoples च्या यादीत भारताच्या साक्षी आणि आलियाला मिळालं स्थान

Times 100 Most Influential Peoples List : टाईम मॅग्झिनकडून ( Time magazine ) जगातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची यादी ( Influential Peoples List ) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या दोन व्यक्तींना स्थान मिळाले आहे. ऑलम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक ( Sakshi Malik ) आणि अभिनेत्री आलिया भट ( Alia Bhat) यांचा यामध्ये समावेश आहे.

‘अजितदादांनी पवारांचं बोट सोडलंय, तेव्हा भाकरी बरोबर फिरवा’; CM शिंदेंचा बारामतीकरांना खास मेसेज

कुस्तीपटू साक्षी मलिकचं या यादीमध्ये नाव येण्याचं कारण देखील समोर आलं आहे. हे कारण म्हणजे साक्षीने भारतीय कुस्ती महासंघ याचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याकडून करण्यात आलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाविरुद्ध उठवलेला आवाज. तर आलिया भटला या यादीत स्थान देण्यात आलं. कारण ती अभिनयासह विविध सामाजिक कार्यात देखील योगदान देत असते.

प्रभावशाली लोकांच्या यादीतील अनिवासी भारतीय…

या यादीमध्ये साक्षी आणि आलिया यांच्यासह मूळ भारतीय असलेल्या मात्र सध्या परदेशामध्ये स्थायिक असलेल्या अनेक लोकांची नाव आले आहेत. ज्यामध्ये हॉलिवूडचे अभिनेते देव पटेल जे एक इंडो-ब्रिटिश अभिनेते आहेत. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला जे मूळ भारतीय आहेत. त्यांचा देखील या यादीमध्ये नाव आलं आहे. तर युएस डिपार्टमेंटच्या लोन प्रोग्राम ऑफिसचे डायरेक्टर जिगर शाह जे मूळचे गुजरातचे आहेत. त्यांचे देखील नाव आलं आहे.

ही निवडणूक भावकीची नाही, अजित पवारांकडून नाव न घेता विरोधकांवर टीका

जागतिक बँकेचे अध्यक्ष उद्योगपती अजय बंगा त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यामध्ये झाला आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध शेफ आस्मा खान यांचा जन्म कोलकाता येथे झाला आहे. त्या सध्या लंडनमध्ये प्रसिद्ध रेस्टॉरंट दार्जीलिंग एक्सप्रेसच्या मालक आहेत. त्याचबरोबर एल युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर प्रियमवदा नटराजन ज्या मुळच्या तामिळनाडूतील कोईमतुर येथील आहेत. त्यांना त्यांच्या ब्लॅक हॉल्स संबंधित अभ्यासासाठी जगभरात ओळखलं जातं. त्यांना देखील या यादीमध्ये स्थान मिळालं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज