Dilip Joshi: ‘तारक मेहता’मधून जेठालाल गायब; काय आहे नेमकं प्रकरण?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चष्मा ही सिरीयल जवळजवळ १६ वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन (Dilip Joshi) करत आहे. (TMKOC) या टेलिव्हिजन माध्यमात एखाद्या कॉमेडी शोने (Comedy show) एवढे वर्ष कायम लोकांचं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सिरीयल मधील प्रत्येक पात्राचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
View this post on Instagram
परंतु गेल्या काही दिवसापासून या सीरियलमध्ये चांगलीच वादाची ठिणगी पडल्याचे बघायला मिळत आहे. अगोदरच अनेकांनी शो सोडून दिला आहे. त्यानंतर निर्माते असित मोदी यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तरी देखील आता आणखी एक मोठी भर पडल्याचे बघायला मिळत आहे.
या सिरियलमधील मुख्य भूमिका असलेल्या जेठालालचा सर्वात मोठा चाहतावर्ग आहे. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी (Actor Dilip Joshi) हे साकारत आहेत. परंतु पुढील काही दिवसातच या सिरियलमधून जेठालाल दिसणार नाही. दिलीप जोशी यांनी सिरीयलमधून काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी ही माहिती दिल्याचे बघायला मिळत आहे.
Mumbai Diaries 2 Trailer: अंगावर शहारा आणणारा ‘मुंबई डायरीज २’चा ट्रेलर आउट
दिलीप जोशी आपल्या कुटुंबासह टांझानियाला धार्मिक प्रवासासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे त्यांनी या शोमधून काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचे सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे दिलीप जोशी यांनी ही माहिती दिल्याचे दिसत आहे. यामुळे आता चाहत्यांना पुढील काही दिवस सीरियलमध्ये जेठालाल दिसणार नाही. जेठालाल दिसणार नसल्यामुळे चाहत्यांना देखील आता थोडी निराशा सहन करावी लागणार आहे.