Anubhav Sinha च्या भीडचा ट्रेलर युट्यूबवरून डिलीट, युजर्स भडकले

Anubhav Sinha च्या भीडचा ट्रेलर युट्यूबवरून डिलीट, युजर्स भडकले

मुंबई : अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) चा चित्रपट ‘भीड’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाची खुप चर्चा झाली. कारण हा चित्रपट 2020 आणि 2021 मध्ये आलेल्या कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमधील वाईट परिस्थितीवर आधारित आहे. चित्रपटाची रिलीज डेट अजून दूर आहे. पण त्यादरम्यान आता चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांकडून युट्यूबवरून डिलीट करण्यात आला आहे. हा ट्रेलर का डिलीट करण्यात आला. याबद्दल काहीही माहिती नाही. पण हा ट्रेलर निर्मात्यांकडून युट्यूबवरून डिलीट करण्यात आल्याने युजर्स भडकले आहेत.

Marathi Drama : नाट्यसृष्टीच्या सक्षमीकरणासाठी रंगकर्मी नाटक समुहाने कसली कंबर

एका आठवड्याआधी हा ट्रेलर युट्यूबवर रिलीज करण्यात आला होता. ट्रेलर रिलीज होताच त्यावरून वाद निर्माण होणार हे ठरलेलंच होत. या ट्रेलरला काही दिवसातच या ट्रेलरला लाखो व्ह्युज देखील मिळाले. मात्र त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांकडून युट्यूबवरून डिलीट करण्यात आला आहे. त्यामुळे आता तुम्ही या चित्रपटाचा ट्रेलर शोधायला गेलात तर तुम्हाला फक्त टीझर मिळेल. पण आता ट्रेलरची लिंक मिळणार नाही.

त्यामुळे आता हा ट्रेलर का डिलीट करण्यात आला. याबद्दल काहीही माहिती नाही. तरी तो डिलीट करण्यामागील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.कारण यावर यूजर्स लिहीतात की, ‘चित्रपटात कोविड लॉकडाउन ज्याप्रमाणे सादर केले गेले आहे. त्यामुळे तो डिलीट करण्यात आला आहे.’ तर आणखी एका लिहीले की, ‘अलं वाटतयं की, यामागे एक पॉवर फुल माणुस आहे. तसेच त्यावर आता लवकरच बॉयकॉटचा ट्रेन्ड सुरू होऊ शकतो.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube