Mratahi Movie : ललित प्रभाकरच्या ‘टर्री’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Mratahi Movie : ललित प्रभाकरच्या ‘टर्री’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या आगामी ‘टर्री’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे.

या ट्रेलरवरून हा चित्रपट कसा असणार आहे याचा अंदाज आपल्याला येतो. यामध्ये संग्राम आणि पै यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. ललित प्रभाकर आणि योगेश डिंबळे यांनी या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करत प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभी राहत या दोघांनीआपली मैत्री जपली आहे.

मात्र अचानक या मैत्रीमध्ये वादळ निर्माण होतं. याचा सामना हे दोन मित्र कसे करतात ? या चित्रपटात पहायला मिळणार आहे. मजा, मस्ती, टशन आणि नात्यामधला ओलावा जपताना ‘टर्री’ कशाप्रकारे प्रत्येक कठिण प्रसंगामध्ये उभा राहतो ? अशी या चित्रपटाची काहीशी कथा असल्याचं समजत आहे. पण ही पूर्ण कथा पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहातच जाव लागणार आहे.

या चित्रपटात ललित प्रभाकर सोबत अभिनेत्री गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर, आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन श्रीराम बडवे, प्रवीण जहागीरदार यांचे आहे. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत.

‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने ‘टर्री’ या डॅशिंग चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube