Chauk Movie : जिवाभावाची माणसं भेटणारा ‘चौक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी येणार चित्रपटगृहात

Chauk Movie : जिवाभावाची माणसं भेटणारा ‘चौक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी येणार चित्रपटगृहात

Trailer Out Of Marathi movie Chauk : चौक म्हटलं की, आपल्याला आठवत ते वाहन, लाकांच्या येण्या-जाण्याची वर्दळ, वाद, भांडण किस्से, मिरवणुका आणि घटना. अशाच एका चौकाची कथा आता प्रक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया यांनी या चित्रपटाची पहिली झलक पोस्टर आणि ट्रेलरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली होती.

View this post on Instagram

A post shared by Vinod Satav (@satavvinod)

आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही क्षणात हा ट्रेलर सगळीकडे व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरूवातीलाच भव्य गर्दी आणि गणेशोत्सव तसेच चौक यांचं समीकरण दाखवण्यात आलं आहे. अनुराधा प्रॉडक्शन आणि निर्माते दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) प्रस्तुत या चित्रपटात महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट आहे.

या चित्रपटामध्ये मराठीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. या तगड्या स्टार कास्टमुळे चित्रपटाबद्दलची शिगेला गेली आहे. उत्त प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट एक पर्वणी असणार आहे.

Gautami Patil ‘या’ चित्रपटात झळकणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी त्यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. तर हा चित्रपट येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube