Shahrukh Khan : बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ ची त्सुनामी, 10 व्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई

Shahrukh Khan : बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ ची त्सुनामी, 10 व्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ (Pathaan) ची जादू 10 व्या दिवशीही कायम आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या कमबॅक चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेली स्पाय थ्रिलर ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला. यावेळी पहिल्याच दिवशी याचित्रपटाने 57 कोटींचं कलेक्शन केलं. त्यानंतर अनुक्रमे 10 दिवसांची कमाई 70.5 कोटी, 39.25 कोटी, 53.25 कोटी, 60.75 कोटी, 26.5 कोटी, 23 कोटी, 18.25 कोटी, 15.65 कोटी, 15 कोटी अशा प्रकारे आहे. त्यामुळे आता या चित्रपटाने एकुण 379.18 कोटींचं कलेक्शन केलं.

या चित्रपटात शाहरूख खान शिवाय जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण,आशुतोष राणा आणि डिंपल कंपाडिया यांनी देखील महत्त्वाची भूमिका निभावली आहे. जबरदस्त अॅक्शन सिक्वेंस आणि वीएफएक्स पाहुन चाहते शॉक होत आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 400 कोटी क्लबमध्ये सामिल होईल अशा आपेक्षा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube